IND vs WI Test Series 2025 Dainik Gomantak
देश

IND vs WI: भारताचा वेस्ट इंडिजला 'व्हाईटवॉश'! दुसऱ्या कसोटीत 7 विकेट्सने लोळवलं; 'हे' 4 खेळाडू ठरले विजयाचे शिल्पकार

IND vs WI Test Series 2025: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धचा कसोटी मालिकेत शानदार कामगिरी करत २-० असा व्हाईटवॉश केला आहे.

Sameer Amunekar

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धचा कसोटी मालिकेत शानदार कामगिरी करत २-० असा व्हाईटवॉश केला आहे. दिल्लीतील दुसरी कसोटी भारताने ७ विकेट्सने जिंकली आणि घरच्या मैदानावर शुभमनचा पहिला कसोटी मालिका विजय नोंदवला.

१४ ऑक्टोबर रोजी संपलेल्या दिल्ली कसोटीत भारताने पहिल्याच डावात ५१८ धावा करून वर्चस्व गाजवले. यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल या जोडीने जोरदार फलंदाजी केली. यशस्वीने २५८ चेंडूत १७५ धावा करून आपल्या कसोटी कारकिर्दीतील ७ वे शतक झळकावले, तर गिलने नाबाद १२९ धावांची खेळी साकारत आपले पाचवे कसोटी शतक पूर्ण केले.साई सुदर्शनने (८७), नितीश कुमार रेड्डीने (४३) आणि ध्रुव जुरेलने (४४) मौल्यवान योगदान देत भारताचा डाव ५१८ धावांवर घोषित केला.

वेस्ट इंडिजचा संघर्ष

वेस्ट इंडिजने पहिल्या डावात २४८ धावा केल्या, ज्यात त्यांचे फलंदाज भारताच्या फिरकीसमोर टिकू शकले नाहीत. कुलदीप यादवने २६.५ षटकांत ५ बळी घेतले, तर रवींद्र जडेजाने ३ बळी मिळवले. त्यानंतर वेस्ट इंडिजला फॉलोऑन देण्यात आला.

दुसऱ्या डावात मात्र पाहुण्यांनी पुनरागमन केले. जॉन कॅम्पबेलने ११५ धावा करून आपले पहिले कसोटी शतक झळकावले, तर शाई होपने १०३ धावा करून आठ वर्षांनंतर कसोटीत शतक साजरे केले. शेवटच्या टप्प्यात जस्टिन ग्रीव्हज (५०) आणि जेडेन सील्स (३२) यांनी १०व्या विकेटसाठी ७९ धावांची महत्त्वाची भागीदारी केली आणि संघाचा एकूण स्कोर ३९० पर्यंत नेला.

पाचव्या दिवशी भारताचा सहज विजय

भारतासमोर केवळ १२१ धावांचे लक्ष्य होते. पाचव्या दिवशी टीम इंडिया फलंदाजीसाठी उतरली तेव्हा फक्त ५८ धावांची गरज उरली होती. साई सुदर्शन ३९ धावांवर बाद झाला, तर शुभमन गिल १३ धावांवर माघारी परतला.

मात्र केएल राहुलने संयमी आणि प्रभावी फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याने १०८ चेंडूत नाबाद ५८ धावा केल्या, ज्यात ६ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.

मालिका भारताच्या नावावर

पहिली कसोटी भारताने अहमदाबादमध्ये एक डाव आणि १४० धावांनी जिंकली होती. दुसऱ्या कसोटीत ७ विकेट्सने विजय मिळवत भारताने २-० अशी मालिका आपल्या नावावर केली.

शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील हा घरच्या मैदानावरील पहिलाच कसोटी मालिकाविजय ठरला आहे. संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात प्रभावी कामगिरी करून भारतीय क्रिकेटच्या नवीन युगाची झलक दाखवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Robbery Incident: सराफा दुकानाचे शटर फोडले, सीसीटीव्हीवर स्प्रे मारला, पण पोलिसांच्या 'सतर्कते'मुळे चोरट्यांचा चोरीचा डाव फसला; चावडी बाजारात मध्‍यरात्री थरार!

Horoscope: नवीन संधी येऊ शकते, महत्त्वाच्या निर्णयात संयम हवा! वाचा तुमच्या राशीचे भविष्य

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

SCROLL FOR NEXT