IND vs PAK Champions Trophy 2025 Head to Head Reord
क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या प्रतिस्पर्ध्यांपैकी एक भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना २३ फेब्रुवारी रोजी रंगणार आहे. या रोमांचक लढतीसाठी दोन्ही संघांचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत. जेव्हा जेव्हा हे दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकतात, तेव्हा क्रिकेट विश्वाचे लक्ष या लढतीकडे असते.
भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंची चमकदार कामगिरी आणि अनुभवी खेळाडूंचा भरघोस अनुभव संघासाठी फायदेशीर ठरणार आहे. गोलंदाजांची धार आणि फलंदाजांची आक्रमकता पाहता, भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे.
पाकिस्तान संघही कमकुवत नाही. वेगवान गोलंदाजी आणि तगडी फलंदाजी यामुळे हा संघ कोणत्याही क्षणी सामना फिरवू शकतो. पाकिस्तान संघातील असलेल्या काही स्टार खेळाडूंमुळे भारताला सावध राहावे लागेल.
एकदिवसीय सामन्यातील आकडेवारी
आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये एकूण १३५ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. ज्यात भारताने ५ सामने जिंकले आहेत तर पाकिस्तानने ७३ सामने जिंकले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचा भारताविरुद्धचा रेकॉर्ड चांगला आहे.
गेल्या ६ एकदिवसीय सामन्यांमधील दोन्ही संघांच्या कामगिरीवर नजर टाकली तर भारताने ५ सामने जिंकले आहेत आणि एक सामना अनिर्णीत राहिला.
चॅम्पियन्स ट्रॉफीत कोण सरस?
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये एकूण ५ सामने झाले आहेत. ज्यात पाकिस्तानने ३ सामन्यांमध्ये भारताला पराभूत केलं आहे.
तर, भारताला फक्त २ सामने जिंकता आले आहेत. २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताला हरवून पाकिस्तानने विजेतेपद जिंकण्यात यश मिळवले होते.
दुबईमध्ये दोन्ही संघांचा रेकॉर्ड
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत ज्यात भारताने दोन्ही सामने जिंकले आहेत. दोन्ही सामने २०१८ मध्ये आशिया कप दरम्यान दुबईमध्ये खेळले गेले होते.
ज्यामध्ये भारताने विजय मिळवला होता. याशिवाय, भारताने दुबईमध्ये आतापर्यंत ७ एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी ६ सामने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत सुटला.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना अत्यंत चुरशीचा होणार असून दोन्ही संघातील खेळाडू जिंकण्यासाठी जीव तोड प्रयत्न करतील. चाहत्यांसाठी हा सामना क्रिकेटचा खरा आनंद देणारा ठरेल. २३ फेब्रुवारीला मैदानात कोणता संघ बाजी मारणार याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.