India vs Pakistan: टीम इंडियाला हरवण्यासाठी पाकड्यांचा 'मास्टरप्लॅन', शोएब अख्तर, म्हणाला, 'त्या' फलंदाजाला 2 ओव्हर्समध्ये आउट करा

Asia Cup 2025 Final: आशिया कप २०२५ चा अंतिम सामना इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणार आहे.
Asia Cup 2025 Final, India vs Pakistan
Asia Cup 2025 Final, India vs PakistanDainik Gomantak
Published on
Updated on

आशिया कप २०२५ चा अंतिम सामना इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणार आहे. कारण ४१ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तान हे दोन प्रतिस्पर्धी संघ जेतेपदाच्या लढाईत समोरासमोर उभे ठाकले आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणारा हा सामना केवळ अंतिम स्पर्धा नसून, भावनांचा महापूर, प्रतिष्ठेची लढाई आणि क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधणारा प्रसंग ठरणार आहे.

भारताचा वरचष्मा, तरी पाकिस्तान आशावादी

या स्पर्धेत टीम इंडियाने पाकिस्तानला दोन वेळा पराभूत केले आहे. पहिला विजय ग्रुप स्टेजमध्ये आणि दुसरा सुपर फोर फेरीत. त्यामुळे भारतीय संघाच्या आत्मविश्वासाला उंची मिळाली आहे. तरीही, पाकिस्तानचे दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तर, ज्यांना ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ म्हणून ओळखले जाते, यांनी पाकिस्तानच्या विजयाबाबत आशा व्यक्त केली आहे.

अख्तरचे म्हणणे आहे की जर पाकिस्तानने भारताचा आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्मा याला सुरुवातीला बाद करण्यात यश मिळवले, तर टीम इंडिया मोठ्या अडचणीत येऊ शकते.

Asia Cup 2025 Final, India vs Pakistan
High Court: गोवा सरकारला मोठा झटका; वैद्यकीय, दंत महाविद्यालयातील Sports Quota रद्द

शोएब अख्तरची जिंकण्याची योजना

एका पाकिस्तानी वाहिनीवर बोलताना अख्तर म्हणाले, “अभिषेक शर्मा टीम इंडियाला सलामीला नेहमीच जबरदस्त सुरुवात देतो. त्यामुळे पाकिस्तानने त्याला दोन षटकांच्या आत बाद करणे अत्यावश्यक आहे. जर तसे झाले नाही, तर भारत सहजतेने डाव उभारेल.”

तो पुढे म्हणाला, “पाकिस्तानने हे लक्षात ठेवले पाहिजे की पूर्ण २० षटके खेळवण्याची गरज नाही, तर भारताला शक्य तितक्या लवकर गुंडाळायचे आहे. जर आपण भारताला ऑलआउट केले, तर त्यांचा गेम प्लॅन कोलमडेल आणि त्यांना धावा कशा काढायच्या यासाठी संघर्ष करावा लागेल.”

अख्तरच्या मते, सुरुवातीचे दोन षटकेच निर्णायक ठरणार आहेत. अभिषेक शर्मा बाद झाल्यास, भारताची फलंदाजी दबावाखाली येईल आणि चांगली सुरुवात गमावल्याने संपूर्ण डाव संकटात सापडेल.

Asia Cup 2025 Final, India vs Pakistan
GST on Sports: क्रिकेट प्रेमींसाठी वाईट बातमी, सामने पाहणं आणखी महाग होणार, तिकिटांच्या किमतींवर इतका GST आकारला जाणार

सामना का ठरणार आहे ‘विशेष’?

  • भारत–पाकिस्तान यांच्यात पहिल्यांदाच आशिया कपची फायनल खेळली जाणार.

  • ४१ वर्षांनंतर क्रिकेट विश्वाला ही दुर्मिळ लढत पाहायला मिळणार.

  • दोन्ही संघांकडे फॉर्मात असलेले तरुण खेळाडू तसेच अनुभवी दिग्गज खेळाडू आहेत.

  • आशिया खंडातील प्रेक्षकांसोबत जगभरातील कोट्यवधी चाहते या सामन्याकडे डोळे लावून बसले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com