Foreigner In Goa: गोवा आहे का 'पास्को काउंटी'? नग्न विदेशी पर्यटकाचा म्हापशात गोंधळ, दुकानदारांना दिला त्रास

Foreigner In Goa: काही दिवसांपूर्वी कुडचडे आणि केपे तालुक्याच्या सीमेवरील गावात असाच प्रकार उघडकीस आला होता.
Foreigner Detained by Goa Police
Foreigner In Goa Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: काही दिवसांपूर्वी कुडचडे आणि केपे तालुक्याच्या सीमेवरील गावात एक व्यक्ती पूर्णपणे नग्न होऊन महिलांना घाबरवत असल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर आता म्हापशात एका विदेशी पर्यटकाने नग्न होऊन काणका परिसरात गोंधळ घातला. पर्यटकाला कपडे घालण्याची स्थानिकांनी विनंती केली पण त्याने नकार दिला. अखेर म्हापसा पोलिसांनी या पर्यटकाला ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पर्यटक अंगावरील सर्व कपडे काढून काणका - म्हापसा परिसरात नग्न फिरत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. काही स्थानिकांनी पर्यटकाला तू असा का फिरतोयस? असा सवाल केला. पण, पर्यटक पुढे जात त्याने एका दुकानदाराला वावडे दाखवत त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला, असे व्हिडिओत दिसत आहे.

Foreigner Detained by Goa Police
Curchorem Helmet Man: डोक्यावर हेल्मेट, अंगावर कपडे नाही; कुडचड्यात नग्नावस्थेत फिरून महिलांना करतोय लक्ष्य; Video Viral

स्थानिकांनी पर्यटकाला कपडे घालण्याची विनंती केली मात्र त्याने त्यास नकार दिला. नग्नावस्थेतच त्याने काणका परिसरात गोंधळा घातल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच म्हापसा पोलिसांनी विदेशी पर्यटकाला ताब्यात घेतले आहे. विदेशी पर्यटक नेमका कोणत्या देशातील आहे? याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, पोलिसांनी पर्यटकाला ताब्यात घेतले असून, पुढील कारवाई सुरु आहे.

कुडचडे आणि केपे परिसरात नग्न व्यक्तीची दहशत

काही दिवसांपूर्वी कुडचडे आणि केपे तालुक्याच्या सीमेवरील गावात असाच प्रकार उघडकीस आला होता. यात एक अनोळखी व्यक्ती रात्रीच्या वेळेस नग्नावस्थेत महिलांना टार्गेट करत असल्याचे समोर आले होते. नग्न व्यक्ती अंधारात लपून दुचाकीवरुन आलेल्या महिलांना पकडण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या डोक्यावर केवळ हेल्मेट होते. स्थानिकांनी याप्रकरणी कारवाईची मागणी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com