India vs Pakistan Dainik Gomantak
देश

India vs Pakistan: भारताचा पाकिस्तानवर एकतर्फी विजय! विराट कोहलीसह 'हे' खेळाडू ठरले विजयाचे शिल्पकार

Champions Trophy 2025: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २३ फेब्रुवारी रोजी दुबई येथे खेळवण्यात आला.

Sameer Amunekar

Champions Trophy 2025 IND vs PAK

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २३ फेब्रुवारी रोजी दुबई येथे खेळवण्यात आला. भारतीय संघाने पाकिस्तानला ६ विकेट्सने हरवून उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळजवळ निश्चित केले आहे. या सामन्यात विराट कोहली आणि शुभमन गिल व्यतिरिक्त कुलदीप यादवनेही शानदार कामगिरी केली.

३४२ धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. रोहितने २० धावांचे योगदान दिले. तर शुभमन गिलने ४६ धावांचे योगदान दिले. याशिवाय श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांनीही चांगला खेळ केला. अय्यरने अर्धशतकी खेळी केली. अय्यरने ६७ चेंडूत ५६ धावा केल्या, ज्यात ५ चौकार आणि १ षटकार होता.

विराट कोहलीने या सामन्यात दमदार शतक झळकावून पाकिस्तानला पराभवाची चव चाखायला लावली. कोहलीने १११ चेंडूत नाबाद १०० धावा करत पाकिस्तानचा पराभव केला. यादरम्यान किंग कोहलीने ७ चौकार मारले.

कोहली हा एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्ध शतके करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. याशिवाय, त्याने या सामन्यात आपले १४,०० एकदिवसीय धावा पूर्ण केले.

भारताला विजय मिळवून देण्यात विराट कोहलीसह श्रेयस अय्यर, कुलदीप यादव यांनी मोलाची भूमिका बजावली. यासह आणखी काही खेळाडू होते, ज्यांनी हा विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. कोण आहेत भारतीय संघाच्या विजयाचे हिरो? जाणून घ्या.

'हे' खेळाडू ठरले विजयाचे शिल्पकार

फलंदाजीत विराट कोहलीनं दमदार फलंदाजी करत शानदार शतक ठोकलं. श्रेयस अय्यरनं ५६ धावा करत दमदार फलंदाजी केली. तर युवा शुभमन गिलनं ४६ धावांचं योगदान दिलं.

गोलंदाजीत भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय हार्दिक पंड्याने २ विकेट्स घेतल्या, ज्यामध्ये बाबर आझमचा विकेटचा समावेश होता. हर्षित राणा, अक्षर आणि जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT