ravindra jadeja washington sundar Dainik Gomantak
देश

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

Mancheter Test Draw: कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारतीय संघाने शुभमन गिल रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या शानदार शतकांच्या जोरावर इंग्लंडची मोठी आघाडी (Lead) संपुष्टात आणली.

Manish Jadhav

Mancheter Test Draw: इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने अविश्वसनीय पुनरागमन करत यजमान इंग्लंडला (England) सामना अनिर्णित (Draw) राखण्यास भाग पाडले. कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारतीय संघाने शुभमन गिल रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या शानदार शतकांच्या जोरावर इंग्लंडची मोठी आघाडी (Lead) संपुष्टात आणली आणि दिवसभर फलंदाजी करत पराभव टाळला. यामुळे मालिकेत 1-2 ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघावरील मालिकेतील पराभवाचे संकट टळले.

ऐतिहासिक भागीदारी

ओल्ड ट्रॅफर्डवरील (Old Trafford) चौथ्या दिवशी इंग्लंडने भारतीय संघावर 311 धावांची मोठी आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या डावाच्या पहिल्याच षटकात भारताचे दोन महत्त्वाचे गडी बाद झाल्याने संघाचा पराभव निश्चित मानला जात होता. याच परिस्थितीत, कर्णधार शुभमन गिल आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी मिळून 174 धावांची उत्कृष्ट भागीदारी करत भारतासाठी ड्रॉची आशा जागवली होती.

राहुलचे शतक हुकले, गिलची झुंज आणि जडेजाला जीवदान

सामन्याच्या अखेरच्या दिवशी भारताला अजून 137 धावांची आघाडी संपवायची होती. दिवसाच्या पहिल्याच सत्रात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stokes) राहुलला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. राहुलचे अवघ्या 10 धावांनी शतक हुकले (90 धावांवर बाद). दुसरीकडे, कर्णधार गिलने हाताला आणि डोक्याला दुखापत होऊनही मोर्चा सांभाळून ठेवला. त्याने कठीण परिस्थितीतून मार्ग काढत या मालिकेत आपले चौथे शतकही (Fourth Century) पूर्ण केले.

मात्र, पहिले सत्र संपण्यापूर्वीच जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) गिलला बाद करुन भारतीय संघाला पुन्हा संकटात टाकले. नेमका हाच क्षण इंग्लंडसाठी घातक ठरला. गिल बाद झाल्यावर क्रीझवर आलेला नवा फलंदाज रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) पहिल्याच चेंडूवर स्लिपमध्ये (Slips) झेलबाद झाला असता, परंतु कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा क्षेत्ररक्षक जो रुटने (Joe Root) ती सोपी संधी गमावली. त्यावेळी भारतीय संघ इंग्लंडपेक्षा 89 धावांनी पिछाडीवर होता, पण इंग्लंडसाठी ही शेवटची संधी ठरली.

जडेजा-सुंदरची निर्णायक भागीदारी आणि सामना ड्रॉ

जीवदान मिळाल्यानंतर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी पुढील दोन सत्रे शानदार फलंदाजी करत इंग्लंडकडून विजयाची संधी हिसकावून घेतली. या युवा अष्टपैलू खेळाडूने (Young All-rounder) स्वतःला सिद्ध केले. सुंदर आणि जडेजाने या दोन सत्रांमध्ये एकूण 334 चेंडू खेळले आणि 203 धावांची नाबाद भागीदारी (Unbeaten Partnership) केली. या भागीदारीमुळे भारतीय संघ 425 धावांपर्यंत पोहोचला. दोघांनीही अखेरच्या सत्रात आपली शतके पूर्ण केली आणि भारताला (India) 114 धावांची आघाडी मिळवून दिली, त्यानंतर दोन्ही संघांनी सामना ड्रॉ करण्यासाठी सहमती दर्शवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लग्नाचे वचन दिले, घरात बोलणी सुरु झाली पण 'तो' शरीराची भूक भागवून पसार झाला; गोव्यात सरकारी अधिकाऱ्याविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा

Mormugao: मुरगावात ४० इमारती धोकादायक! पालिका इमारतींचाही समावेश; ठोस कृती करण्याची गरज

Mhaje Ghar: 'भाजप सरकार कोणाचेच घर मोडणार नाही'! मुख्यमंत्र्यांची ग्वाही; सर्व घरे कायदेशीर करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा

Goa Today's News Live: जबडा तुटला, पाळीव कुत्र्याच्या तोंडावर झाडली गोळी, गुन्हा दाखल

Chapora River: शापोरा नदी घेणार ‘मोकळा’ श्‍‍वास! सव्वालाख घनमीटर गाळ निघणार; सात ते आठ कोटींचा येणार खर्च

SCROLL FOR NEXT