Missile test  Dainik Gomantak
देश

India tests Ballistic Missile: आयएनएस अरिहंतवरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

बंगालच्या उपसागरातील लक्ष्याचा अचूक भेद

गोमन्तक डिजिटल टीम

India tests Ballistic Missile: अण्विक क्षमतेने परिपुर्ण असलेली भारतीय पाणबुडी आयएएस अरिहंतने शुक्रवाकरी बॅलेस्टिक मिसाईलचे यशस्वी परीक्षण केले. संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. बंगालच्या उपसागरातील लक्ष्य या क्षेपणास्त्राने अत्यंत अचूकतेने भेदले.

संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, अण्वस्त्र वापराबाबत भारताचे एक धोरण आहे, ते म्हणजे नो फर्स्ट युज पॉलिसी. त्यानुसार भारत स्वतः कधीही प्रथम अण्वस्त्रांचा वापर करणार नाही. पण, अण्वस्त्र संपन्न राष्ट्रांशी लढताना भारतही सक्षम असावा या उद्देशाने ही क्षमता भारत वाढवत आहे. किमान प्रतिकार क्षमता असे भारताचे धोरण आहे.

त्याअंतर्गत ही चाचणी करण्यात आली आहे. आयएनएस अरिहंतने एसएलबीएम ची यशस्वी चाचणी केली, यातून हे क्षेपणास्त्र ऑपरेट करणाऱ्या चालक दलाचीही योग्यता सिद्ध झाली आहे. देशाच्या अण्वस्त्ररोधी क्षमतेसाठी हे खूप महत्वाचे आहे, असे मंत्रालयानेही म्हटले आहे. सर्व ऑपरेशनल आणि टेक्निकल पॅरामीटर्सची पुर्तताही यात चाचणीतून झाली आहे.

अशी आहे आयएनएस अरिहंत?

आयएनएस अरिहंत ही भारताची एकमेव अण्वस्त्र संपन्न पाणबुडी आहे. यातून बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली जाऊ शकतात. ही पाणबुडी जमिन, हवेत आणि समुद्रातही अण्वस्त्र हल्ला करण्याची क्षमता असलेली आहे. भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याची ताकद असलेल्या शत्रु राष्ट्रांपासून आयएनएस अरिहंत ही पाणबुडी भारताचे रक्षण करते. ही पाणबुडी भारतानेच विकसित केलेली आहे. 110 मीटर लांबी आणि 11 मीटर रूंदी असलेल्या या पाणबुडीचे वजन 6000 टन आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway: शाळेच्या गणवेशात घरातून पळाला, बेपत्ता मुलगा रत्नागिरीत सापडला; 'मत्स्यगंधा एक्स्प्रेस'चा टीसी ठरला देवदूत

Asia Cup Rising Stars 2025: भारताचे फायनलचे स्वप्न भंगले, सुपर ओव्हरमध्ये बांगलादेशने मारली बाजी; भारतीय खेळाडूंनी केली निराशा VIDEO

Goa History: कुशावती गाळाने भरली, गोव्यातील कदंब राजकर्त्यांनी चांदोर येथून जुवारी नदीकिनारी राजधानी नेली..

Tejas Fighter Jet Crash: दुबई एअर शोमध्ये 'तेजस' लढाऊ विमान कोसळले; दुर्घटनेत वैमानिकाचा दुर्देवी मृत्यू

AUS vs ENG 1st Test: ॲशेसमध्ये 100 वर्षांतील सर्वात मोठा रेकॉर्ड! स्टार्क-स्टोक्सच्या माऱ्यापुढे फलंदाज ढेपाळले; पहिल्याच दिवशी 19 विकेट्स VIDEO

SCROLL FOR NEXT