India Speaks on UCC Dainik Gomantak
देश

India Speaks on UCC: विवाह, घटस्फोट, वारसाबाबत बहुसंख्य मुस्लिम महिलांचा समान नागरी कायद्याला पाठिंबा

देशभरात समान नागरी कायद्याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे

Puja Bonkile

India Speaks on UCC: देशभरात समान नागरी कायद्याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणूकीच्या पाश्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकार समान नागरी कायदा लागू करण्याबाबत चर्चा करत आहे.

यातच आता, News18 द्वारे समान नागरी संहिता (UCC) वर अमेगा सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, किमान 67.2 टक्के मुस्लिम महिला विवाह, घटस्फोट आणि दत्तक घेणे यासारख्या बाबींसाठी सर्व भारतीयांसाठी समान कायद्याचे समर्थन करतात.

दरम्यान, 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून 8,035 हून अधिक मुस्लिम महिलांनी (Women) सर्वेक्षणात भाग घेतला. सहभागी 18 ते 65 हून अधिक वयोगटातील, विविध समुदाय, प्रदेश, शैक्षणिक आणि वैवाहिक स्थितीतील होते.

UCC ची घोषणा म्हणजे एक कायदा जो सर्व भारतीय नागरिकांना त्यांच्या धर्माचा विचार न करता लागू होईल. कायद्यांमध्ये विवाह, घटस्फोट, दत्तक घेणे आणि वारसा यासारख्या वैयक्तिक बाबींचा समावेश असेल.

  • सर्वेक्षणात काय आढळले आहे?

ते सर्व भारतीयांसाठी समान कायद्यांचे समर्थन करतात का असे विचारले असता, सर्वेक्षण केलेल्या एकूण महिलांपैकी 67.2 टक्के महिलांनी 'होय' आणि 25.4 टक्के 'नाही' असे उत्तर दिले तर 7.4 टक्के महिलांनी 'माहित नाही किंवा सांगू शकत नाही' असे उत्तर दिले.

विशेष म्हणजे, जेव्हा यूसीसीची चर्चा सुरु होती, तेव्हा भारतातील मुस्लिम संघटनांनी त्यांचा सर्व धर्मांवर परिणाम होईल असे म्हणत त्यांचा तीव्र निषेध केला. शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत, 68.4 टक्के किंवा 2,076 पदवीधर महिलांनी सांगितले की, ते UCC चे समर्थन करतात.

तर 27 टक्के म्हणाले की, ते समर्थन करत नाहीत. दरम्यान, वयानुसार प्रतिसादांच्या बाबतीत, 18-44 वयोगटातील 69.4 टक्के महिलांनी सांगितले की, ते UCC च्या समर्थनात आहेत आणि 24.2 टक्के महिलांनी सांगितले की त्यांना सर्वांसाठी समान कायदे नको आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT