Vaccination Dainik Gomantak
देश

Covid-19: कोरोनावर अखेर मिळवला विजय! भारतात आज एकाही मृत्यूची झाली नाही नोंद

Corona Update India: जगभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना भारतात महामारीचा वेग मंदावला आहे.

दैनिक गोमन्तक

Corona Update India: जगभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना भारतात महामारीचा वेग मंदावला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी गेल्या 24 तासांत देशात 625 कोविड-19 रुग्ण आढळले आहेत. 9 एप्रिल 2020 नंतर इतक्या कमी रुग्णांची नोंद झाली आहे. त्याच वेळी, 2020 नंतर अशा पहिल्या घटनेत, 24 तासातील संख्या 14,021 वर आली आहे. मात्र मृतांची संख्या 5,30,509 वर कायम आहे.

दरम्यान, 9 एप्रिल 2020 रोजी एकाच दिवसात 540 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. मार्च 2020 नंतर गेल्या 24 तासात देशात एकाचाही मृत्यू झालेला नाही. कर्नाटकातील (Karnataka) कलबुर्गी येथे 76 वर्षीय व्यक्ती भारतात कोरोना विषाणूचा पहिला बळी ठरला होता. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, एकूण रुग्णांपैकी 0.03 टक्के सक्रिय रुग्ण आहेत, तर राष्ट्रीय कोविड-19 रिकव्हरी रेट 98.78 टक्क्यांवर पोहोचला आहे.

तसेच, या आजारातून बरे होणाऱ्या लोकांची संख्या 4,41,17,611 झाली आहे, तर मृत्यूदर 1.19 टक्के नोंदवला गेला आहे. मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशव्यापी कोविड-19 लसीकरण (Vaccination) मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात कोविड लसीचे 219.74 कोटी डोस देण्यात आले आहेत.

शिवाय, भारतातील (India) कोरोना रुग्णांची संख्या 7 ऑगस्ट 2020 रोजी 20 लाख, 23 ऑगस्ट रोजी 30 लाख, 5 सप्टेंबर 40 लाख आणि 16 सप्टेंबर रोजी 50 लाखांवर गेली होती. 28 सप्टेंबर रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर रोजी 70 लाखांचा आकडा पार केला होता. 29 ऑक्टोबरला 80 लाख, 20 नोव्हेंबरला 90 लाख आणि 19 डिसेंबरला एक कोटीचा टप्पा पार केला. भारतात 4 मे रोजी 2 कोटी, गेल्या वर्षी 23 जून रोजी 3 कोटी आणि यावर्षी 25 जानेवारी रोजी 4 कोटी प्रकरणे पार केली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT