नवी दिल्ली: मागील तीन दशकांत हवामान बदलामुळे आलेल्या आपत्तीच्या घटनांमुळे ज्या देशांवर सर्वाधिक परिणाम झाले आहेत, त्या देशांच्या यादीत भारत जगात नवव्या स्थानावर आहे. भारतात मागील तीन दशकात अशा सुमारे ४३० घटना घडल्या असून, त्यात सुमारे ८० हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती ‘द क्लायमेट रिस्क इंडेस्क’(सीआरआय) २०२६मध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.
ब्राझील येथील बेलेम येथे सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या ‘कॉप-३०’ हवामान परिषदेमध्ये मंगळवारी हा अहवाल सादर करण्यात आला आहे.
अहवालात नमूद केले आहे की, १९९५ ते २०२४ या कालावधीमध्ये हवामान बदलामुळे आलेल्या आपत्तींमध्ये सुमारे १.३ अब्ज नागरिकांचा मृत्यू झाला असून सुमारे १७० अब्ज अमेरिकन डॉलर इतके आर्थिक नुकसान झाले.
भारतातील नुकसान हे प्रामुख्याने वारंवार येणारे पूर, चक्रीवादळे, दुष्काळ व उष्णतेच्या लाटांमुळे झाले असून, या घटना जागतिक तापमानवाढीमुळे अधिक तीव्र झाल्या आहेत.
अहवालातील ठळक मुद्दे
भारताची मोठी लोकसंख्या आणि मॉन्सूनची अनिश्चितता यामुळे भारताचे अधिक नुकसान वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे सार्वजनिक वित्तीय ताण वाढत आणि गरिबीत वाढ १९९५ ते २०२४ दरम्यान हवामान बदलामुळे जगभरात नऊ हजार ७०० हून अधिक आपत्ती; यात साडे आठ लाखाहून अधिक जणांचा मृत्यू २०२४ मध्ये पूर आणि वादळे यांच्यामुळे सर्वाधिक नुकसान
आंदोलक व सुरक्षा रक्षकांत झटापट
संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत (कॉप ३०) काही आंदोलकांची सुरक्षा रक्षकांत झटापट झाली. मुख्य सभागृहात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या या कार्यकर्त्यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मागे ढकलले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.