India plan to host high level meeting of NSA on Afghanistan issue Pakistan also invited  Dainik Gomantak
देश

अफगाणिस्तान मुद्द्यावर भारताची दिल्लीत बैठक, पाकिस्तनलाही आमंत्रण ?

अफगाणिस्तानमधील (Afghanistan) परिस्थितीवर पुढील महिन्यात दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची (NSA) बैठक होणार आहे.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानमधील (Afghanistan) परिस्थितीवर पुढील महिन्यात दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची (NSA) बैठक होणार आहे. भारत (India) त्याचे यजमानपद भूषवणार आहे . इतर अनेक देशांसह रशिया (Russia) आणि पाकिस्तानलाही (Pakistan) या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. या प्रादेशिक परिषदेसाठी चीन(China), इराण(Iran), ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांनाही आमंत्रित करण्यात आल्याचे मानले जाते. यामध्ये अफगाणिस्तानमधील मानवतावादी संकटाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. याशिवाय सुरक्षेच्या मुद्द्यांवरही या बैठकीत चर्चा होणार आहे.(India plan to host high level meeting of NSA on Afghanistan issue Pakistan also invited)

ही प्रास्तवित चर्चा 10-11 नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, ही परिषद पूर्वी इराणमध्ये 2019 मध्ये झालेल्या प्रादेशिक सुरक्षा परिषदेच्या स्वरुपातच असेल. या उच्चस्तरीय बैठकीला आमंत्रित केलेल्यांमध्ये अफगाणिस्तानचे शेजारी रशिया, चीन, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांचा समावेश आहे. असे कळले आहे की पाकिस्तानचे एनएसए मोईद युसुफ यांनाही या बैठकीला आमंत्रण देण्यात आले आहे, जरी परिषद आणि आमंत्रणावर अद्याप अधिकृत पुष्टीकरण झाले नसले तरी त्या बैठकीची तयारी सुरू असल्याचे कळत आहे.

तालिबानकडून असलेल्या अपेक्षांची जगाला जाणीव करून दिली जाईल. असे सांगितले जात आहे की ज्या देशांच्या NSA ला आमंत्रित केले गेले आहे त्यांना भारताकडून आधीच आमंत्रण मिळाले आहे. मात्र, तालिबानला या परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आलेले नाही. ही बैठक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिल्लीत होणार आहे. रशियानेही 20 ऑक्टोबर रोजी मॉस्कोमध्ये अशीच परिषद आयोजित केली आहे. यामध्ये भारतासह त्याने तालिबान्यांनाही बोलावले आहे. मात्र, तालिबान्यांना येथे आमंत्रित करण्याबाबत भारत सरकार अजूनही संभ्रमात आहे. कारण तालिबानने अद्याप आंतरराष्ट्रीय समुदायाच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. त्याच्याकडून बरेच काही अपेक्षित आहे, विशेषत: मानवाधिकारांच्या प्रश्नांच्या संदर्भात. यामध्ये महिला, मुले आणि अल्पसंख्यांकांच्या मानवी हक्कांचा समावेश आहे.

या परिषदेत सतत तालिबानच्या समर्थनात सतत उतरणारा पाकिस्तान काय भूमिका घेतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे .या बैठीकीसाठी जर्रफ़ आमंत्रण दिले असेल तर पाकिस्तानी एनएसए मोईद युसूफ येतो की नाही हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल. असे झाल्यास, 2016 मध्ये अमृतसरमध्ये तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांचे परराष्ट्र सल्लागार सरताज अझीझ यांच्यानंतर दोन्ही बाजूंच्या उच्च अधिकाऱ्याची ही पहिली भेट असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; रवींच्‍या व्‍हिजनवर गोविंदांची वाटचाल

Goa Education: 'यापुढे कठीण प्रश्‍‍नपत्रिका न देण्‍यावर भर देऊ'! तिसरीच्या प्रश्नपत्रिकेवरून गोंधळ, SCERT संचालकांचे प्रतिपादन

Who After Ravi Naik: फोंड्यातील पोटनिवडणुकीवरून भाजपसमोर पेच! रवी नाईक यांचे कनिष्‍ठ सुपुत्र 'रॉय' यांच्या नावाचाही आग्रह

Ranji Trophy 2025: हुर्रे! गोव्याची दणदणीत विजयी ‘दिवाळी’, चंडीगडला नमवले; पाहुणा 'ललित' सामन्याचा मानकरी

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

SCROLL FOR NEXT