Asia Cup 2025 Points Table Dainik Gomantak
देश

Asia Cup 2025 Points Table: पाकिस्तानवर मात करूनही Team Indiaचं नुकसान, पॉइंट्स टेबलमध्ये झाली घसरण

Asia Cup 2025 India vs Pakistan: पाकिस्तानविरुद्ध दमदार विजय मिळवूनही भारतीय संघाला पॉइंट्स टेबलमध्ये मोठा फटका बसला आहे.

Sameer Amunekar

Asia Cup 2025 India Pakistan points table

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रविवार, १४ सप्टेंबर रोजी टी-२० आशिया कप २०२५ च्या ग्रुप-अ मधील सहाव्या सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी झाला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारताने ७ विकेट्सने विजय मिळवला. हा त्यांचा सलग दुसरा विजय ठरला, तर पाकिस्तानला पहिला पराभव स्वीकारावा लागला.

पाकिस्तानची निराशाजनक फलंदाजी

नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजी निवडली. मात्र, सुरुवातीपासूनच त्यांना धक्के बसले. फक्त ६ धावांवर २ विकेट गमावल्याने संघ अडचणीत सापडला. साहिबजादा फरहानने ४० धावांची खेळी केली, तर शाहीन आफ्रिदीने ३३ धावा करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पूर्ण संघ २० षटकांत ९ विकेट गमावून फक्त १२७ धावा उभारू शकला.

भारताकडून कुलदीप यादवने प्रभावी गोलंदाजी करत ३ विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

भारताचा सहज विजय

१२८ धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माने आक्रमक फलंदाजीने सुरू केला. त्याने फक्त १३ चेंडूत ३१ धावा ठोकल्या. तिलक वर्मानेही ३१ धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ४७ धावांची खेळी साकारली. अखेर भारताने २५ चेंडू राखून ३ विकेट्स गमावून सामना जिंकला.

नेट रन रेटमुळे नुकसान

विजयानंतरही भारताचा नेट रन रेट घसरला. यूएईविरुद्धच्या मोठ्या विजयामुळे भारताचा NRR १०.४८३ वर गेला होता. मात्र पाकिस्तानविरुद्ध १५.५ षटकांत लक्ष्य गाठल्याने NRR ४.७९३ वर आला. परिणामी, टीम इंडिया अव्वल स्थानावर कायम असली तरी नेट रन रेटमध्ये घसरण झाली.

पॉइंट्स टेबल – ग्रुप अ

  • भारत: २ सामने – २ विजय – ४ गुण – NRR ४.७९३

  • पाकिस्तान: २ सामने – १ विजय, १ पराभव – २ गुण – NRR १.६४९

  • ओमान: १ सामना – ० गुण

  • यूएई: १ सामना – ० गुण

पॉइंट्स टेबल – ग्रुप ब

  • अफगाणिस्तान: १ सामना – १ विजय – २ गुण – NRR ४.७००

  • श्रीलंका: १ सामना – १ विजय – २ गुण – NRR २.५९५

  • बांगलादेश: २ सामने – १ विजय – २ गुण

  • हाँगकाँग: २ सामने – २ पराभव – ० गुण

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT