Children Dainik Gomantak
देश

नेपाळ आणि पाकिस्तानपेक्षा भारत भूक आणि कुपोषणात मागेच

दैनिक गोमन्तक

भूक आणि कुपोषणावर (hunger and malnutrition) नजर ठेवणारा 'ग्लोबल हंगर इंडेक्स 2021' चा (Global Hunger Index) अहवाल आला आहे. मात्र हा अहवाल भारतासाठी (India) चांगलीच चिंता वाढवणारा आहे. या यादीत भारत 101 व्या स्थानावर घसरला आहे, जो 2020 मध्ये 94 व्या स्थानावर होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या रॅंकिंगमध्ये भारत शेजारी असणाऱ्या पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळच्या (Pakistan, Bangladesh and Nepal) मागे आहे. 116 देशांच्या यादीत भारताला 101 वे स्थान मिळाले आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान 92 व्या स्थानावर, नेपाळ आणि बांगलादेश 76 व्या स्थानावर आहेत.

ग्लोबल हंगर इंडेक्समधील माहितीनुसार, चीन, ब्राझील आणि कुवेत (China, Brazil and Kuwait) यासह 18 देशांनी पाचपेक्षा कमी GHI गुण मिळवून पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत. ग्लोबल हंगर इंडेक्स हे लोकांना वेगवेगळ्या देशांमध्ये अन्नपदार्थ कसे आणि किती सकस प्रमाणात मिळतात हे दाखवण्याचे माध्यम आहे. 'ग्लोबल हंगर इंडेक्स' हा निर्देशांक दरवर्षी ताज्या आकडेवारीसह जाहीर केला जातो.

हा निर्देशांक काय आहे?

या निर्देशांकाद्वारे, उपासमारीविरुद्धच्या मोहिमेतील यश आणि अपयश जगाला दाखवून देण्याचा प्रयत्न केला जातो. हा अहवाल आयर्लंडची सहायता संस्था कन्सर्न वर्ल्डवाइड आणि जर्मनीची संस्था वेल्ट हंगर हिल्फे यांच्या संयुक्तविद्यामानाने तयार केला आहे. भारतातील उपासमारीच्या पातळीबाबत या अहवालाने चिंता व्यक्त केली आहे. 2020 मध्ये 107 देशांच्या यादीत भारत 94 व्या क्रमांकावर होता. अहवालानुसार भारताचा GHI स्कोअर खाली आला आहे. 2000 मध्ये ते 38.8 होते, जे 2012 ते 2021 दरम्यान 28.8-27.5 पर्यंत कमी झाले.

GHI स्कोअर कसा ठरवला जातो?

GHI स्कोअर चार संकेतकांच्या आधारावर ठरवले जाते - अल्पपोषण, चाइल्ड वेस्टिंग (पाच वर्षांखालील मुले जे त्यांच्या उंचीपेक्षा कमी वजनाचे असतात, तीव्र कुपोषण दर्शवतात), चाइल्ड स्टंटिंग (पाच वर्षाखालील वयाची मुले ज्यांची उंची वयापेक्षा कमी आहे, तीव्र कुपोषण दर्शवणारे) आणि बालमृत्यू (पाच वर्षांखालील मुलांचा मृत्यूदर).

उच्च GHI म्हणजे त्या देशात उपासमारीची समस्या अधिक आहे. त्याचप्रमाणे, जर एखाद्या देशाचा स्कोअर कमी असेल तर याचा अर्थ असा की तेथील परिस्थिती अधिक चांगली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT