Spy Network Busted Dainik Gomantak
देश

Spy Network Busted: पैशांसाठी देशाशी गद्दारी? सुरक्षा यंत्रणांकडून देशातील गुप्तहेर नेटवर्कचा पर्दाफाश; एकामागून एक अटक

Spy Network Busted In India: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. दहशतवाद्यांची ठिकाणे आणि हेरगिरी नेटवर्कचा सुरक्षा यंत्राणांकडून पर्दाफाश केला जात आहे. देशातील एका हेरगिरी नेटवर्कबद्दल आणि ते कसे काम करायचे याबाबत एक मोठा खुलासा झाला आहे.

Manish Jadhav

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत. दहशतवाद्यांची ठिकाणे आणि हेरगिरी नेटवर्कचा सुरक्षा यंत्राणांकडून पर्दाफाश केला जात आहे. देशातील एका हेरगिरी नेटवर्कबद्दल आणि ते कसे काम करायचे याबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. गुप्तचर संस्थेला याची माहिती मिळताच एकामागून एक अटक करण्याची मालिका सुरु झाली.

गुप्तचर संस्थांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानमधून (Pakistan) डझनभर नंबर सक्रिय झाले आहेत. या नंबरद्वारे पाकिस्तानमध्ये सातत्याने कॉल केले जात होते. गुप्तचर संस्थांसाठी आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ज्या नंबरवरुन पाकिस्तानमधून कॉल येत होते आणि ज्या नंबरवर भारतात कॉल आणि मेसेज केले जात होते ते दोन्ही भारतीय सिम होते. गुप्तचर संस्था आयबी गेल्या काही दिवसांपासून या नंबरवर लक्ष ठेवून होती. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, असे काही नंबर सक्रिय झाले जे बराच काळ बंद होते.

पेमेंट गेटवेद्वारे पैसे पाठवले जात होते

दरम्यान, हे नंबर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, गुजरात आणि आसाममध्ये सक्रिय होते. एन्क्रिप्टेड अ‍ॅप्सवरही या नंबर्सची सक्रियता वाढली होती. पेमेंट गेटवेद्वारे या नंबर्सवर पैसे पाठवले जात होते. त्यानंतर या नंबर्सचा माग काढण्यात आला आणि हेरगिरी नेटवर्क पर्दाफाश सुरक्षा यंंत्रणांनी केला. आयबीने या सर्व नंबर्सची माहिती राज्य पोलिसांसोबत शेअर केली, त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणांहून अनेक लोकांना अटक करण्यात आली.

ठोस पुरावे मिळाल्यानंतर गुप्तचर यंत्रणांच्या सूचनेनुसार वेगवेगळ्या राज्य पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. हरियाणातील (Haryana) हिस्सार येथील ज्योती मल्होत्रा, कैथल येथील देवेंद्र सिंग ढिल्लन, नूह येथील अरमान आणि तारिफ आणि पानिपत येथील नोमान इलाही यांना अटक करण्यात आली. पंजाबमधील गुरुदासपूर येथील सुखप्रीत सिंग आणि कर्णबीर सिंग, मालीर कोटला येथील गजाला आणि मालीर, अमृतसर येथील सुरा मसीह आणि पलक शेर मसीह, जालंधर येथील मोहम्मद अली मुर्तजा यांना अटक करण्यात आली. याशिवाय, यूपीतील रामपूर येथील शहजाद, वाराणसी येथील तोहफिल, दिल्ली येथील मोहम्मद हारुन आणि आसाम येथील 7 जणांना या हेरगिरी नेटवर्कमध्ये अटक करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'छोटा पॅकेट बडा धमाका'! सापावर भारी पडली चिमुरडी मांजर, दोघांमधील झुंज पाहून हैराण व्हाल

Birsa Munda Jayanti: बिरसा मुंडा जयंती; काणकोणात शोभायात्रेची तयारी जोरात Video

Ind vs SA WC Final 2025: वर्ल्डकप फायनलपूर्वी मोठी बातमी! लाल मातीची खेळपट्टी भारतासाठी ठरणार धोकादायक? Pitch Report आला समोर

Janjira Fort: 1670 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी अभेद्य जलदुर्गास समुद्रमार्गे वेढा घातला होता; कान्होजी आंग्रे व अजिंक्य जंजिरा

Supermoon 2025: चंद्र येणार पृथ्वीच्या जवळ, दुर्बिणी-टेलीस्कोपचीही गरज नाही; कुठे आणि कसा पाहाल हा 'दुर्मिळ क्षण'?

SCROLL FOR NEXT