Lieutenant General Rahul R Singh  Dainik Gomantak
देश

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Lieutenant General Rahul R Singh: भारतीय उप लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल आर सिंग यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.

Manish Jadhav

Operation Sindoor India: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून घेतला. भारताने पुन्हा एकदा पाकड्यांची चांगलीच जिरवली. याचदरम्यान आता, भारतीय उप लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल आर सिंग यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारत केवळ पाकिस्तानशीच नव्हे तर चीनशीही लढाई करत होता, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, संपूर्ण ऑपरेशन दरम्यान हवाई संरक्षण आणि त्याचे ऑपरेशन महत्वाचे होते. आपल्याकडे एक सीमा आणि दोन शत्रू होते, प्रत्यक्षात तीन. पाकिस्तानला चीन सर्वतोपरी मदत करत होता.

FICCI ने आयोजित केलेल्या 'न्यू एज मिलिटरी टेक्नॉलॉजीज' कार्यक्रमात लेफ्टनंट जनरल बोलत होते. ते पुढे म्हणाले की, "पाकिस्तानच्या (Pakistan) लष्करी हार्डवेअरपैकी 81 टक्के चीनकडून येते. चीन इतर शस्त्रूंविरुद्ध आपल्या शस्त्रांची टेस्ट घेण्यासाठी पाकिस्तानचा प्रयोगशाळेसारखा उपयोग करतो. भारताविरोधात पाकिस्तानला तुर्कीनेही मदत केली. जेव्हा DGMO स्तरावरील चर्चा सुरु होती तेव्हा पाकिस्तानला चीनकडून आपल्या महत्त्वाच्या वेक्टरबद्दल थेट अपडेट्स मिळत होत्या."

ते पुढे बोलताना म्हणाले की, 'ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. म्हणूनच त्यांनी युद्धबंदीची मागणी केली.' एवढ्यावरच न थांबता लेफ्टनंट जनरल यांनी पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांच्या तळांवर अचूक हल्ले केल्याबद्दल भारतीय जवानांचे तोंडभरुन कौतुक केले. त्यांनी टार्गेटची निवड, नियोजनात धोरणात्मक संदेश, तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि मानवी बुद्धिमत्तेचा कुशलतेने वापर यावर भर दिला.

दरम्यान, पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने (India) ऑपरेशन सिंदूर राबवले. 6-7 मे च्या रात्री भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईनंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला. त्यानेही भारतावर हल्ला केला. पाकिस्तानने क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे हल्ला केला, ज्याला भारतीय सैन्याने योग्य उत्तर दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोगो'वरुन गदारोळ, युरी आलेमावांनी गॅझेट फाडून हवेत भिरकावले, खुर्च्या उचलण्याचा प्रयत्न; MLA वीरेश बोरकरांना काढले सभागृहातून बाहेर

eSakal No 1: ई-सकाळचा करिष्मा कायम! 21.2 दशलक्ष वाचकांसह पुन्हा 'नंबर वन'

Video: चोरट्याची फजिती! स्कूटी घसरली, हेल्मेट पडलं अन् स्वतःही पडला; सोशल मीडियावरील 'हा' व्हिडिओ एकदा बघाच

IND vs ENG 4th Test: ओल्ड ट्रॅफर्डवर जो रुटचा दबदबा, द्रविड-कॅलिसला मागे टाकून रचला इतिहास; नावावर केला 'हा' मोठा रेकॉर्ड

Goa Assembly: पोगो ठरावावरुन विधानसभेत राडा, सभापती संतापले, वीरेश बोरकरांना सभागृहातून काढले बाहेर; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT