देशात कोरोनाचा प्रादूर्भाव (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दररोज लाखोंच्या संख्येने नवे कोरोनाबाधित आढळून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर कोवीशिल्ड(Covishield)या कोरोना प्रतिबंधक लसीनंतर आता भारत बायोटेकने (Bharat Biotech) कोव्हॅक्सिन (Covaxin) लसींचे दर कमी केले आहेत. कोव्हॅक्सिनचा दर आता 200 रुपयांनी घटला आहे. राज्य सरकारांना(State governments) कोव्हॅक्सिन लस आता 400 रुपयात मिळणार आहे.
काही दिवसांपूर्वी भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनचा वाढवलेला दर जाहीर केला होता. त्यानुसार आता राज्य सरकारांना कोव्हॅक्सिन 600 रुपये प्रति डोस मिळणार आहे. तर खासगी रुग्णालयांना 1200 रुपये प्रति डोस या किमतीला मिळत होता. मात्र आता लसींच्या किमतीत घट करण्यात आली आहे.
दरम्यान, आता राज्य सरकारांना कोव्हॅक्सिन 400 रुपयांना प्रति डोस मिळणार आहे. तर खासगी रुग्णालयांना मात्र 1200 रुपयेच प्रति डोस किंमत मोजावी लागणार आहे. भारत बायोटेक कंपनीने पत्रक प्रसिध्द करत ही माहीती दिली आहे. भारत बायोटेकने प्रसिध्द केलेल्या पत्रकात म्हटलं की, सध्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसमोर असलेली आव्हाने लक्षात घेऊन आम्ही कोव्हॅक्सिन लस राज्य सरकारांना आता 400 रुपये प्रति डोस मिळणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.