Panaji Smart City: 'स्मार्ट सिटी' कामांचे 'IPSCDL'कडून समर्थन; आरोप नव्हे, वस्तुस्थिती पाहा; 48 इलेक्ट्रिक बसेस, 362 'सीसीटीव्हीं'चा दाखला

IPSCDL Smart City Clarification: स्मार्ट सिटी प्रकल्पांची अंमलबजावणी, खर्च आणि पायाभूत सुविधांच्या देखभालीबाबत प्रसारमाध्यमांतून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडने (आयपीएससीडीएल) स्पष्टीकरण दिले आहे.
Panaji Smart City
Panaji Smart CityDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: स्मार्ट सिटी प्रकल्पांची अंमलबजावणी, खर्च आणि पायाभूत सुविधांच्या देखभालीबाबत प्रसारमाध्यमांतून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडने (आयपीएससीडीएल) स्पष्टीकरण दिले आहे. सार्वजनिक निधीच्या विनियोगाबाबत प्रश्न विचारणे योग्य असले, तरी आरोप आणि अंदाज यांची वस्तुस्थितीशी गल्लत करू नये, असे संस्थेने पत्रकातून स्पष्ट केले आहे.

पणजीत ४८ शून्य-उत्सर्जन इलेक्ट्रिक बस सुरू केल्या असून, शहराच्या सुरक्षेसाठी ३६२ स्मार्ट सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह एकात्मिक नियंत्रण यंत्रणा उभारली आहे. भूमिगत वीजवाहिन्या, मांडवी किनारी पदपथ व प्रोमिनेड विकसित करणे, स्मार्ट रस्ते आणि पादचारी मार्गांची निर्मिती अशी कामेही पूर्ण केल्याचे संस्थेने म्हटले आहे.

पायाभूत सुविधांचा दीर्घकालीन लाभ मिळावा, यासाठी पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सरकारी यंत्रणांशी समन्वय राखण्यास कटिबद्ध असल्याचे आयपीएससीडीएलने स्पष्ट केले आहे.

Panaji Smart City
Goa POCSO Court: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण; बसचालकाला 13 वर्षे सक्तमजुरी, पोक्सो न्यायालयाचा निकाल

भूमिगत वीजवाहिन्या, स्मार्ट रस्ते

 पणजीत ४८ शून्य-उत्सर्जन इलेक्ट्रिक बसेस सुरू.

 शहराच्या सुरक्षेसाठी ३६२ स्मार्ट सीसीटीव्ही कॅमेरे.

 कॅमेऱ्यांसाठी एकात्मिक उभारली नियंत्रण यंत्रणा.

 भूमिगत वीजवाहिन्या, स्मार्ट रस्ते, पादचारी मार्ग, मांडवी किनारी प्रोमिनेड.

Panaji Smart City
Goa Cabinet Expansion: मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्याची एन्ट्री! संकल्प आमोणकर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, खाती सोमवारी मिळण्‍याची शक्‍यता

काही प्रकल्पांचे हस्तांतरण पूर्ण

 पादचारी मार्गिका आणि क्लाइंबिंग वॉल नागरिकांसाठी खुली.

 सुरक्षेच्या कारणास्तव रात्री प्रवेशावर निर्बंध.

 क्लाइंबिंग वॉलचा ८० हून अधिक जणांनी घेतला लाभ.

रायबंदर कम्युनिटी मार्केटचे काम पूर्ण झाल्याचा आयपीएससीडीएलचा दावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Upcoming Cars November 2026
amit patkar 15 day ultimatum goa govt
CJP Protest in Goa
Santinez Footpath Damage Panaji