Tuyem Hospital Issues: तुये इस्पितळातील समस्या तातडीने सोडवा, मांद्रे काँग्रेस गट समितीकडून आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन सादर

Mandrem Congress Block Committee: तुये येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न इस्पितळातील समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी मांद्रे काँग्रेस गट समितीने केली आहे.
Tuyem Hospital Issues
Tuyem Hospital IssuesDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पेडणे: तुये येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न इस्पितळातील समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी मांद्रे काँग्रेस गट समितीने केली आहे. यासंदर्भात समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आरोग्य अधिकारी डॉ. अनिल हुम्रसकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

इस्पितळातील वातानुकूलन यंत्रणेतील बिघाडामुळे प्रयोगशाळेच्या कामकाजावर परिणाम होत असून, रक्तनमुने तपासणीसाठी म्हापसा जिल्हा रुग्णालयात पाठवावे लागत आहेत. त्यामुळे प्रयोगशाळा अद्ययावत करून सर्व प्रकारच्या रक्ततपासण्यांची सुविधा तुये येथेच उपलब्ध करावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच, मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणि दुचाकी पार्किंग परिसरात असलेल्या धोकादायक जुन्या पाण्याच्या टाक्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सहकार्याने हटवाव्यात, अशी मागणीही समितीने केली.

Tuyem Hospital Issues
Goa POCSO Court: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण; बसचालकाला 13 वर्षे सक्तमजुरी, पोक्सो न्यायालयाचा निकाल

समितीचे अध्यक्ष नारायण रेडकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. रुग्णांना वेळेवर उपचार आणि आवश्यक सुविधा मिळण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, असे आवाहन समितीने केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.