Rafale Jet 
देश

India Attack Pakistan: भारताचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर; इस्लामाबाद, कराची, बहावलपूरमध्ये हवाई हल्ला

Operation Sindoor: पाकिस्ताने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता भारताने पाकला जोरदार प्रत्युत्तर देत हवाई हल्ला केला आहे.

Pramod Yadav

नवी दिल्ली: पाकिस्तानने भारतात ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता भारताने देखील पाकला जशास तशे उत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद, कराची आणि बहावलपूरमध्ये हवाई हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. पाकव्याप्त काश्मीर, सियालकोट, लाहोर, कराची या ठिकाणी पाकिस्तानकडून ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. भारताने पाकिस्तानमध्ये क्षेपणास्त्र डागल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, भारताने केलेल्या हल्ल्याचे इस्लामाबादमध्ये मोठ्या स्फोटाचे आवाज ऐकू आले आहेत. याशिवाय लाहोर, कराचीमध्ये देखील स्फोटाचे आवाज ऐकू आल्याची महिती समोर आली आहे. भारतीय सैन्याच्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानने या शहरांमध्ये अगोदर ब्लॅकआऊट जारी केला आहे. पाकिस्ताने भारतात हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर भारतीय सैन्यांकडून त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.

नौदलाकडूनही हल्ला

पाकिस्तानच्या या कारवाईनंतर भारतीय नौदल देखील अॅक्शनमोडमध्ये आले असून, कराची बंदरावर हल्ला करण्यात आला आहे. समुद्रात तैनात असलेल्या आयएनएस विक्रांत आणि कोलकत्ता क्लास डिस्ट्रॉयर वरुन कराची बंदरावर दहा क्षेपणास्त्र डागण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सेनाप्रमुख असीम मुनीरला ताब्यात घेतल्याची माहिती

भारत - पाक यांच्यात सुरु असलेल्या या घडामोडी दरम्यान, पाकिस्तानी सेनाप्रमुख असीम मुनीरला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. असीम मुनीर याला युद्धाची खुमखुमी होती त्यामुळे पाकिस्तानवर ही परिस्थिती ओढवल्याचे बोलले जात आहे. यानंतर मुनीरला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरोधात देशद्रोहाचा खटला चलवला जाणार असल्याची माहिती देखील माध्यामांमधून समोर येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT