India National Flag
India National Flag Dainik Gomantak
देश

Independence Day: अभिमानाने फडकवला जाणारा कापडी राष्ट्रध्वज येतो कुठून?

Chetan Lakkaibailkar

पणजी: स्‍वातंत्र्य (independence day) आणि प्रजासत्ताक दिनी (Republic day) राष्ट्रध्वजाला (National Flag) अनन्यसाधारण महत्त्‍व असते. या दिवशी मोठ्या अभिमानाने फडकवला जाणारा कापडी ध्वज येतो कुठून? असा प्रश्‍‍न बऱ्याच जणांना पडतो. तर देशातील सर्वाधिक कापडी राष्ट्रध्वज पुरविले जातात ते कर्नाटकातील (Karnataka) धारवाड येथून. गोव्यातही (Goa) गरग (धारवाड) येथून राष्ट्रध्वजाची मागणी असते. यंदा मात्र मागणीत घट झाल्याचे खादी ग्रामोद्योग बाजारचे मार्केटिंग व्यवस्थापक अनिल आर्या यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले. (Textile national flags in India are supplied from Dharwad in Karnataka)

कर्नाटकातील गरग (धारवाड) येथे देशात सर्वाधिक प्रमाणात राष्ट्रध्वजाची निर्मिती केली जाते. राज्यात दरवर्षी 20 ते 30 हजार तिरंग्यांची निर्यात करतो, असे गरग येथील खादी ग्रामोद्योग संयुक्त संघाचे व्यवस्थापक विजयकुमार यांनी सांगितले. 2013 साली राज्यात तिरंग्याची सर्वाधिक विक्री झाली होती. पण गेल्या वर्षीपासून खरेदीत मोठी घट झाल्याचे खादी ग्रामोद्योग बाजारातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. यंदा केवळ 150 ध्वज मागविले आहेत, अशी माहिती अनिल आर्या यांनी दिली. गेल्‍यावर्षी अधिक प्रमाणात ध्वज मागविले होते, ते शिल्लक राहिले. राज्यात मडगाव आणि पणजी येथील खादी बाजारातून तिरंग्यांची विक्री होते.

उज्ज्वल इतिहास

तिरंग्याला उज्ज्वल इतिहास आहे. 22 जुलै 1947 रोजी पहिल्यांदा देशात तिरंगा फडकला. याबाबत जाणकारांमध्ये मतभेद आहेत. कारण, तत्पूर्वी 7 ऑगस्ट 1906 रोजी कोलकाता येथील पारशी बागान चौकात (ग्रीन फोर्ट) येथे तिरंगा फडकविल्याचे सांगितले जाते. या काळात तिरंग्यावर अशोक चक्राऐवजी चरखा होता. स्वातंत्र्यानंतर त्याच्या स्वरूपात बदल झाला.

एक नजर...

  • तिरंगा फडकावण्याबाबत भारतीय ध्वज संहिता लागू आहे. त्यानुसार तिरंग्याचा अवमान करणाऱ्याला तुरुंगवासही होऊ शकतो.

  • तिरंगा केवळ कॉटन, सिल्क किंवा खादीचा वापरावा असा नियम आहे. प्लास्‍टिकच्या ध्वजावर बंदी आहे.

  • विशेषतः 2 ते 3 फुटांचे ध्वज शाळा, पंचायती आणि निमशासकीय कार्यालयावर फडकावले जातात. 3-4.5 फुटांच्या ध्वजांना अधिक मागणी असते. सरकारी कार्यालयांवर विशेषतः 4-6 फुटांचे ध्वज फडकवले जातात.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT