Rahul Gandhi And Mallikarjun Kharge Dainik Gomantak
देश

काँग्रेसकडून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वारेमाप पैशाचा वापर; आयकर विभागाकडे पुरावा असल्याचा दावा

Income Tax Department: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी आयकर विभागाच्या कारवाईमुळे काँग्रेसच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत.

Manish Jadhav

Income Tax Department: आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी आयकर विभागाच्या कारवाईमुळे काँग्रेसच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. सुमारे 200 कोटी रुपयांची नोटीस बजावल्यानंतर आता आयकर विभागाने 1800 कोटींची नोटीस बजावली आहे. याचदरम्यान, काँग्रेसविरोधात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे करचुकवेगिरीचे ठोस पुरावे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एप्रिल 2019 मध्ये छापेमारीदरम्यान जप्त केलेल्या पुराव्यांच्या आधारे आयकर विभागाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने अत्याधिक प्रमाणात पैशाचा वापर केल्याचे आढळून आले आहे.

दरम्यान, काँग्रेसने आयकर विभागाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. यामध्ये आयकर विभागाने 2013-14 ते 2019-20 या वर्षांसाठी केलेल्या पुनर्मूल्यांकन प्रक्रियेला आव्हान देण्यात आले होते. सुनावणीदरम्यान, उच्च न्यायालयाने आयकर विभागाने दिलेली माहिती विचारात घेतली, ज्यात म्हटले होते की, गेल्या अनेक निवडणुकांमध्ये काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात पैशाचे व्यवहार झाले आहेत.

न्यायालयाकडून काँग्रेसला दिलासा मिळाला नाही

आपल्या आधीच्या आदेशात, उच्च न्यायालयाने असे म्हटले होते की, आयकर विभागाकडे आयटी कायद्यांतर्गत तपास करण्यासाठी ठोस पुरावे आहेत. आयकर विभागाने दिलेल्या माहितीत तथ्य नसल्याचे काँग्रेस दाखवू शकत नाही, असे न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे. 520 कोटी रुपये मूल्यांकनातून सुटले असते, असेही न्यायालयाने म्हटले. हे मूल्यांकन 31 मार्चपर्यंत पूर्ण करायचे होते. मात्र, मूल्यांकनाची कार्यवाही पूर्ण होण्याच्या अंतिम मुदतीच्या काही दिवस आधी काँग्रेसने न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे न्यायालयाने आयकर विभागाकडून करण्यात येत असलेल्या मूल्यांकन प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार दिला होता.

काँग्रेसला पुरावे दिले

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाकडील उपलब्ध पुरावे काँग्रेसला देण्यात आले आहेत. यादरम्यान काँग्रेसला उत्तर देण्यासाठी अनेक संधी देण्यात आल्या. काँग्रेसने दाखल केलेल्या उत्तरांचा विचार करुन आयकर विभागाने आता 7 वर्षांचे मूल्यांकन पूर्ण केले आहे. 2018-19 च्या मूल्यांकन वर्षात, काँग्रेसने कलम 13A च्या अटींचे उल्लंघन केल्यामुळे ही सूट मागे घेण्यात आली.

भाजपने आयकर, ईडी आणि सीबीआयचा गैरवापर केल्याचा आरोप काँग्रेसने केला

मात्र, आयकर विभागाच्या कारवाईमुळे काँग्रेसमध्ये चांगलीच नाराजी दिसून येत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजप सरकार देशातील लोकशाही प्रक्रिया नष्ट करण्यासाठी आयकर विभाग, ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला. काँग्रेसला त्रास देण्यासाठी भाजप सरकार आयकर विभागाचा हत्यार म्हणून वापर करत असल्याचेही ते पुढे म्हणाले. भाजपवर निशाणा साधत राहुल गांधी यांनी आयकर विभागाच्या कारवाईला 'टॅक्स टेररिझम' असे म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Of Baroda Cyber Attack: बँक ऑफ बडोदावर सर्वात मोठा सायबर हल्ला? 1 टीबी संवेदनशील डेटा डार्क वेबवर लीक; ग्राहकांची धडधड वाढली

Dharmendra Pradhan Reaction: "मी 'स्ट्रीट फायटर', एसी रुममध्ये बसणारा नाही!", राजीनाम्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची पहिली प्रतिक्रिया; जुन्या आठवणींना दिला उजाळा

क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच! अंपायरनं रनआऊट दिलं, तरीही फलंदाजानं सुरु ठेवली फलंदाजी; 'तो' निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट Watch Video

Bihar Bandh Violence: बिहार बंददरम्यान विद्यार्थ्यांवर थेट 'एके-47' ने गोळीबार! पोलिसांचा अमानुष चेहरा कॅमेऱ्यात कैद; एसआयटी जवान डिस्मिस

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

SCROLL FOR NEXT