काही दिवसांपूर्वीच एक लाखपेक्षा अधिक भोंगे उतरवल्यानंतर पुन्हा भोंगे लागणार नाहीत. असे ही आदेश उत्तर प्रदेश सरकार अर्थात योगी आदित्यनाथ यांनी दिले होते. यानंतर आता योगी सरकारने मदरशांमध्ये राष्ट्रगीत म्हणणं अनिवार्य केले आहे. उत्तर प्रदेशाचे अल्पसंख्याक राज्यमंत्री दानिश आझाद अन्सारी यांनी हा आदेश दिला आहे. (In Uttar Pradesh, it is mandatory to sing the national anthem in madrassas )
24 मार्च रोजी उत्तर प्रदेशातील मदरशा शिक्षण मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर 9 मे रोजी याबाबतचा आदेश पारित करण्यात आला आहे. त्यामुळे आता शाळा सुरू होण्यापूर्वी गायल्या जाणाऱ्या धार्मिक प्रार्थनेबरोबरच राष्ट्रगीत देखील गायलं जाणार आहे.
गुरुवार 12 मे पासून मदरशा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानंतर पहिल्याच दिवसांपासून म्हणजेच आजपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.हा आदेश सर्व मान्यताप्राप्त, अनुदानित आणि विनाअनुदानित मदरशांना लागू असेल, असंही संबंधित आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे. यापूर्वी २०१७ मध्ये उत्तर प्रदेश मदरशा बोर्डानं स्वातंत्र्यदिनी मदरशांमध्ये राष्ट्रगीत आणि ध्वजारोहण अनिवार्य केलं होतं.
या आदेशानंतर जवळपास पाच वर्षांनी राज्यातील सर्व मदरशांमध्ये दररोज शाळा सुरू होण्यापूर्वी धार्मिक प्रार्थनेसोबत राष्ट्रगीत म्हणणं अनिवार्य करण्यात आलं आहे. असा निर्णय योगी सरकारने घेतला असला तरी यावर राजकिय नेते काही भाष्य घेतात का हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.