Crime Dainik Gomantak
देश

धक्कादायक! पोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाने पोलिस ठाण्यासमोरच घेतले पेटवून

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खेरीमध्ये बुधवारी रात्री उशिरा एका व्यक्तीने पोलिस स्टेशनच्या आवारात स्वतःला पेटवून घेतले आहे.

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये (Lakhimpur Kheri) बुधवारी रात्री उशिरा एका व्यक्तीने पोलिस स्टेशनच्या आवारात स्वतःला पेटवून घेतले आहे. स्थानिक एसएचओ, स्टेशन प्रभारी आणि गुंडांच्या संगनमताने त्रस्त होऊन तरुणाने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. शिवम गुप्ता असे स्वत:ला पेटवून घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. जो टॅक्सी चालक आहे. या आगीत गंभीर भाजलेल्या शिवम गुप्ता (Shivam Gupta) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (In Lakhimpur Kheri, a young man set himself on fire after being harassed by the police)

दरम्यान, मीडियाला दिलेल्या निवेदनात पीडितेने म्हटले आहे की, 'स्थानिक गुंड स्थानिक पोलिस (Police) अधिकाऱ्यांच्या संगनमताने माझ्याकडून पैसे उकळायचा.'

पीडित तरुणाच्या म्हणण्यानुसार, 'स्थानिक गुंड मला मारहाणही करायचा. दुसरीकडे पोलीस अधिकारी माझ्याकडून मासिक ₹ 2,500 लाच घेत असत.'

त्याचवेळी, पोलीस ठाण्यासमोर आग लावून घेण्याच्या या घटनेनंतर पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. पीडित तरुण शिवम गुप्ता याने केलेल्या आरोपाची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांनी दिले असून त्या भागातील स्टेशन प्रभारींना निलंबित करण्यात आले आहे.

शिवाय, लखीमपूरचे (Lakhimpur Kheri) पोलीस प्रमुख संजीव सुमन यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ''आम्ही पीडित तरुणाचे म्हणणे ऐकूण घेतले आहे. त्यानुसार तो परिसरात टॅक्सी चालवत होता. दरम्यान मागील 3-4 दिवसांपासून स्थानिक लोकांकडून त्याला त्रास दिला जात होता. स्थानिक पोलीस या गुंडांना अनुकूल असल्याचा आरोप पीडित तरुणाने केला आहे. परिसरातील एसएचओंना निलंबित करुन चौकशीचे करण्याचे आदेश दिले आहेत.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Road Repair: 'नोव्हेंबर अखेरपर्यंत गोव्यातील रस्ते उत्तम स्थितीत', मंत्री कामतांनी दिली ग्वाही; रस्ता खोदणाऱ्यांसाठी दिला इशारा

Exam Paper Issue: 3रीच्या प्रश्नपत्रिकेवरून गोंधळ! विद्यार्थ्यांना मानसिक धक्का बसल्याचा दावा; पालकांचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

‘ही अतिशय दुर्दैवी स्थिती', सेवानिवृत्तांना मुदतवाढ देण्याच्या प्रथेबद्दल कोर्टाचे ताशेरे; यंत्रणेचे मनोबल खच्ची केल्याचा ठपका

Lotulim Shipyard Blast: लोटली येथे शिपयार्डमध्ये आगीमुळे मोठा स्फोट; 2 कामगारांचा होरपळून मृत्यू; 4 जखमी

Yusuf Pathan Post Controversy: 'आदिनाथ मंदिर की आदिना मशीद'? युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा आक्षेप; सोशल मीडियावर फुटले नव्या वादाला तोंड

SCROLL FOR NEXT