apps Dainik Gomantak
देश

Bihar: 12 जिल्ह्यांमध्ये ट्विटरसह 22 अ‍ॅपवर तीन दिवसांसाठी बंदी

राज्य सरकारने 12 जिल्ह्यांमध्ये इंटरनेटवर अंकुश ठेवत पुढील तीन दिवस फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅपसह 22 साइट्स आणि अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.

दैनिक गोमन्तक

Agnipath Agnivir Scheme Protests: बिहारमध्ये 18 जून रोजी होणाऱ्या बंदपूर्वी, राज्य सरकारने 12 जिल्ह्यांमध्ये इंटरनेटवर अंकुश ठेवत पुढील तीन दिवस फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅपसह 22 साइट्स आणि अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. (In Bihar the state government has banned 22 sites and apps including Facebook Twitter and WhatsApp in 12 districts for three day)

दरम्यान, यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करणेही बंद करण्यात आले आहे. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव चैतन्य प्रसाद यांनी इंटरनेटद्वारे (Internet) संदेशांचे व्यवहार थांबवण्यासाठी हा आदेश जारी केला आहे.

तसेच, ही बंदी लागू होणार्‍या जिल्ह्यांमध्ये कैमूर, भोजपूर, औरंगाबाद (Aurangabad), रोहतास, बक्सर, नवादा, पश्चिम चंपारण, समस्तीपूर, लखीसराय, बेगुसराय, वैशाली आणि सारण जिल्ह्यांचा समावेश आहे.

दुसरीकडे, बिहारमध्ये (Bihar) अग्निपथ योजनेला विरोध होत असतानाच, आंदोलकांनी विक्रमशिला ट्रेनची नासधूस केली. माचिस घेऊन चोरटे स्टेशनवर पोहोचले. काही विद्यार्थ्यांनी स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनजवळील एका दुकानातून माचिस खरेदी करुन पहिल्यांदा एसी थर्ड टायरची शीट आणि त्यात ठेवलेली चादर-उशी पेटवली. एसी बोगीमुळे आग झपाट्याने पेटली आणि एकामागून एक विक्रमशिलाचे 23 डबे जळून खाक झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT