Union Home Minister Amit Shah Dainik Gomantak
देश

"कोरोना संपल्यानंतर नागरिकत्व कायदा लागू करु": अमित शहा

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी मोठे वक्तव्य केले आहे.

दैनिक गोमन्तक

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या अंमलबजावणीबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी मोठे वक्तव्य केले. शहा दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. सुधारित नागरिकत्व कायदा हे वास्तव असून तृणमूल काँग्रेस त्याबाबत काहीही करु शकत नाही, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे, सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या शाहीन बागसह देशाच्या अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली. हा कायदा मंजूर झाला आहे, मात्र त्यासंबंधीचे नियम अद्याप निश्चित झालेले नाहीत. सरकारने ते कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवले आहे, असे बरेच दिवस बोलले जात होते.

दरम्यान, पश्चिम बंगालच्या (West Bengal) सिलीगुडी जिल्ह्यात शाह म्हणाले की, ''तृणमूल काँग्रेस अफवा पसरवत आहे की, नागरिकत्व कायदा कधीही लागू होणार नाही. पण मी त्यांना सांगू इच्छितो की, कोरोना महामारी संपल्यावर आम्ही CAA लागू करु. ममता दीदींना घुसखोरी हवी आहे, पण CAA हे वास्तव आहे, त्याची अंमलबजावणी केली जाईल.''

शाह (Amit Shah) पुढे म्हणाले, मी आज उत्तर बंगालमध्ये आलो आहे. कोरोना महामारी संपताच आम्ही सुधारित नागरिकत्व कायदा लागू करु. यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाल्या, "ही त्यांची योजना आहे, ते संसदेत विधेयक का आणत नाहीत, ते 2024 मध्ये पुन्हा सत्तेत पुन्हा येणार नाहीत. कोणाचाही नागरिकत्वाचा अधिकार कोणी हिरावून घेऊ नये, अशी माझी इच्छा आहे. आमची एकता हीच आमची ताकद आहे. वर्षभरानंतर ते इथे आले आहेत. ते प्रत्येक वेळी येतात आणि अशा फालतू गोष्टी बोलतात."

याशिवाय, CAA बाबत 2019 च्या उत्तरार्धात आणि 2020 च्या सुरुवातीस देशात मोठ्या प्रमाणावर निषेध करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

Goa Assembly Session: गोवा विधानसभेचा 'खेळखंडोबा'! सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात राज्याच्या भवितव्याचा विसर

SCROLL FOR NEXT