Driving License New Rules: Dainik Gomantak
देश

Driving License New Rules: आता ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी द्यावी लागणार 'ही' परीक्षा!

ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

ज्या लोकांनी त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स काढले नाही त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. ज्या लोकांना ड्रायव्हिंग लायसन्स बनवायचे आहे किंवा ज्यांना त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्सचे नुतनीकरण करायचे असेल तर त्यांना केंद्र सरकारने केलेल्या बदलांची माहिती असणे गरजेचे आहे.

केंद्र सरकारने डीएल बनवण्यासंबंधीच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. आता तुम्ही पूर्वीप्रमाणे कोणत्याही जिल्ह्यात किंवा कोणत्याही व्यक्तीद्वारे डीएल बनवू शकत नाही. बदललेल्या नियमांनुसार आता तुम्ही फक्त त्या जिल्ह्यात ड्रायव्हिंग लायसन्ससाठी (Driving License) अर्ज करू शकता ज्याचा पत्ता तुमच्या आधार कार्डमध्ये असेल.

जे लोक लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठीही नियम बदलण्यात आले आहेत. यासाठी तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा (Aadhar Card) पत्ता असलेल्या जिल्ह्यातून अर्ज करावा लागेल. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाइन (Online) अर्ज करणाऱ्यांना ऑनलाइन चाचणी द्यावी लागेल.

तसेच, तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्डशी लिंक करणे तुमच्यासाठी अनिवार्य असेल. लर्निंग लायसन्ससाठी अर्ज करणार्‍यांसाठी ही चाचणी फेसलेस असायची कारण सरकारने नियम बदलले आहेत. यामध्ये आधार कार्डद्वारे फक्त पत्ता तपासला जातो. या कारणास्तव, तुम्हाला तुमच्या लर्निंग लायसन्ससाठी ज्या जिल्ह्यात आधार कार्ड बनवले आहे, त्या जिल्ह्यातून अर्ज करावा लागेल.

जर तुम्हाला तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स परमानंट बनवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या आधार कार्डच्या पत्त्यावर जावे लागेल. कारण परमानंट डीएल बनवण्यासाठी अर्जदाराची बायोमेट्रिक चाचणी असते.

यापूर्वी ड्रायव्हिंग लायसन्स बनवताना आधार कार्डचा पत्ता परमानंट पत्ता ठेवला जात होता आणि अर्जदार ज्या पत्त्यावर राहतो तो तात्पुरता पत्ता मानला जात होता. आता नवीन नियम बनल्यानंतर तुम्हाला लायसन्ससाठी बायोमेट्रिक पद्धतीने टेस्ट द्यावी लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करताना फक्त आधार कार्ड लिंक केले जाऊ शकते.

जर कोणतीही व्यक्ती ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय गाडी चालवताना पकडली गेली, तर चलान कापले जाईल. हे चलन 5,ooo रुपये असणार आहे. यासोबतच ड्रायव्हिंग लायसन्सच्या नवीन नियमांचे पालन करावे. जर तुमच्या आधार कार्डमध्ये नाव किंवा पत्त्यामध्ये काही चूक असेल तर ती लवकर दुरुस्त करावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

SCROLL FOR NEXT