IMD Rainfall Alert Dainik Gomantak
देश

IMD Rainfall Alert: आली आनंदाची बातमी! येत्या 5 दिवसांत बरसणार मुसळधार सरी, हवामान खात्याने दिली मोठी अपडेट!

IMD Rainfall Alert, Weather Update Forecast: देशभरातील बहुतांश राज्यांमध्ये पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.

Manish Jadhav

IMD Rainfall Alert, Weather Update Forecast: देशभरातील बहुतांश राज्यांमध्ये पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि उत्तर प्रदेशातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

यूपीमध्ये 1 आणि 2 मे रोजी गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 4 मे पर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

त्याचबरोबर, या काळात कमाल तापमानही 31 अंश सेल्सिअसपर्यंत घसरणार असल्याने उष्णतेपासून मोठा दिलासा मिळणार आहे.

अनेक दिवसांपासून कडक ऊन असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची माहिती आहे.

उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनऊमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 4 मे पर्यंत उत्तर प्रदेशातही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

मध्यप्रदेशसह या राज्यांमध्ये पाऊस पडेल

पुढील पाच दिवस मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) विविध ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो, असे हवामान खात्याने सांगितले आहे.

28-30 एप्रिलला विदर्भात, 28 एप्रिलला पूर्व मध्य प्रदेशात आणि 30 एप्रिलला पश्चिम मध्य प्रदेशात गारपीट होईल. याशिवाय, 28 आणि 30 एप्रिलला विदर्भात मुसळधार पाऊस पडणार आहे.

दुसरीकडे, दक्षिण भारताबद्दल बोलायचे झाल्यास, आंध्र प्रदेश, तेलंगणा, रायलसीमा, अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ आणि माहे येथे पुढील पाच दिवस पाऊस पडेल. 28-30 एप्रिलला तेलंगणात आणि 28 एप्रिलला उत्तर कर्नाटकात मुसळधार पाऊस पडेल.

त्याचवेळी, तेलंगणामध्ये 29-30 एप्रिल रोजी मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान खात्यानुसार, ओडिशामध्ये 28-30 एप्रिल, झारखंड आणि गंगा पश्चिम बंगालमध्ये 30 एप्रिल आणि 1 मे रोजी गारपीट होईल.

उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीममध्ये 29 एप्रिल आणि 1 मे रोजी आणि ओडिशामध्ये 30 एप्रिल रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हिमाचल, पंजाब, यूपीसह या राज्यांमध्ये पाऊस पडेल

ईशान्य भारताबद्दल बोलायचे झाल्यास, पुढील पाच दिवस येथे पाऊस सुरु राहणार आहे. 28 एप्रिल ते 2 मे दरम्यान अरुणाचल प्रदेशात, 29 एप्रिल ते 2 मे पर्यंत आसाम आणि मेघालय आणि 1 आणि 2 मे या कालावधीत नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

दुसरीकडे, उत्तर पश्चिम भारतातील राज्यांबद्दल बोलायचे तर, पश्चिम हिमालयीन प्रदेशातील राज्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस, हिमवर्षाव आणि गडगडाटी वादळ दिसू शकते. त्याचवेळी, मैदानी भागात पुढील तीन दिवस पाऊस पडू शकतो.

राजस्थानमध्ये 28 आणि 29 एप्रिलला, उत्तराखंडमध्ये 29 एप्रिल ते 2 मे, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेशमध्ये 1 आणि 2 मे रोजी गारपीट होणार आहे.

हिमाचल प्रदेश, जम्मू विभागात 1 आणि 2 मे रोजी मुसळधार पाऊस पडणार आहे. तर, पश्चिम भारतातील मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात 28 एप्रिल रोजी गारपीट होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT