IMD Rainfall Alert Dainik Gomantak
देश

IMD Rainfall Alert: खूशखबर! ऐन उन्हाळ्यात 'या' राज्यांमध्ये बरसणार सरी, हवामान खात्याने दिली अपडेट

IMD Rainfall Alert: पुढील पाच दिवस देशातील बहुतांश भागात उष्णतेच्या लाटेचा उद्रेक होणार नसल्याचे आयएमडीचे म्हणणे आहे.

Manish Jadhav

IMD Rainfall Alert, Weather Update, 22 April Weather Report: सध्या देशाच्या विविध भागांत कडक ऊन पडत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच, मार्च महिन्यात पाऊस पडल्यानंतर बहुतांश राज्यांमध्ये तापमानात कमालीची वाढ झाली आहे.

मात्र, शनिवारी प्रसिद्ध झालेल्या आपल्या अपडेटमध्ये हवामान खात्याने दिलासादायक बातमी दिली आहे. पुढील पाच दिवस देशातील बहुतांश भागात उष्णतेच्या लाटेचा उद्रेक होणार नसल्याचे आयएमडीचे म्हणणे आहे.

त्यामुळे नागरिकांना कडक उन्हापासून दिलासा मिळणार आहे. त्याचवेळी, पुढील चार दिवस पूर्व मध्य भारत, ईशान्य भारत आणि दक्षिण राज्यांमध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आदल्या दिवशी वायव्य, मध्य आणि पूर्व भारत, गुजरात, महाराष्ट्र, किनारी आंध्र प्रदेश, यानम, तामिळनाडू, केरळ, माहे, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, पुद्दुचेरीमध्ये कमाल तापमान 36-39 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. कराईकल, केरळ (Kerala) माहे येथील कमाल तापमान सामान्यपेक्षा दोन ते चार अंश सेल्सिअसने जास्त होते.

या व्यतिरिक्त, पश्चिम बंगाल, बिहार आणि ओडिशामधील काही ठिकाणी उष्णतेची लाट दिसून आली.

दुसरीकडे, मध्य भारतात पुढील दोन दिवस कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

देशातील उर्वरित भागात पुढील चार दिवस कमाल तापमानात मोठा बदल होणार नाही. त्याचवेळी, पुढील पाच दिवस बहुतांश भागात उष्णतेची लाट नसल्याची आनंदाची बातमी आहे.

23 एप्रिल रोजी दक्षिण हरियाणा, ईशान्य राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे.

बिहारसह या राज्यांमध्ये पाऊस पडेल

हवामान खात्यानुसार, पुढील चार दिवसांत पूर्व भारतात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. 22 एप्रिल रोजी उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीममध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे.

तर, ओडिशामध्ये 22-24 एप्रिल आणि बिहारमध्ये 24 आणि 25 एप्रिल रोजी गारपीट होईल. 24 एप्रिल रोजी ओडिशात (Odisha) काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.

ईशान्य भारताबद्दल बोलायचे झाले तर 22 एप्रिल रोजी अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात मुसळधार पाऊस पडेल.

मध्य भारतात, पुढील चार दिवस पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगडमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. 24 एप्रिलला विदर्भात गारपीट होणार आहे.

दक्षिण भारतातही पावसाचा इशारा

दक्षिण भारताबद्दल बोलायचे झाल्यास, आंध्र प्रदेश, तेलंगणा, अंतर्गत कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, माहे येथे पुढील पाच दिवस हलका पाऊस पडेल.

याशिवाय, 22 आणि 23 एप्रिल रोजी तामिळनाडू, केरळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

24-26 एप्रिल दरम्यान पश्चिम भारतातील मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम भारताबद्दल बोलायचे झाल्यास, पुढील 24 तासांत राजस्थान वगळता इतर ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! दसरा-दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्यांची घोषणा; जाणून घ्या वेळापत्रक

आतिशी भाजपची बाहुली, दारू घोटाळ्यातील नेत्यांना वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरुये; गोवा काँग्रेसची बोचरी टीका

Goa Land Scam: 1200 कोटींच्या भूखंड घोटाळ्याचा पर्दाफाश, ईडीची गोवा आणि हैदराबादमध्ये छापेमारी, 72 लाखांसह 7 आलिशान गाड्या जप्त

पोर्तुगीजांनी नष्ट केलेल्या 1,000 मंदिरांच्या स्मरणार्थ स्मारक मंदिर उभारणार; दिवाडी बेटावर गोवा 'कोटीतिर्थ कॉरिडॉर' प्रकल्प राबवणार

Tomato Fever: टोमॅटोसारखे फोड अन् ताप... लहान मुलांमध्ये 'टोमॅटो फिव्हर'ने वाढवली चिंता; जाणून घ्या लक्षणे, कारणे अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT