CJI Chandrachud  Dainik Gomantak
देश

CJI DY Chandrachud IIT Madras Speech: "टेक्नॉलॉजीचा वापर करुन लोकांशी...", सरन्यायाधीशांनी व्यक्त केली चिंता

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश (CJI) DY चंद्रचूड यांनी शनिवारी (22 जुलै) तंत्रज्ञानाच्या गैरवापराबद्दल चिंता व्यक्त केली.

Manish Jadhav

CJI On Technology Misuse: आयटी क्षेत्रातील एक नवी क्रांती म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे पाहिले जात आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश (CJI) DY चंद्रचूड यांनी शनिवारी (22 जुलै) तंत्रज्ञानाच्या गैरवापराबद्दल चिंता व्यक्त केली.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), मद्रासच्या 60 व्या दीक्षांत समारंभाला CJI चंद्रचूड यांनी हजेरी लावली होती.

दरम्यान, IIT मद्रासच्या दीक्षांत समारंभात CJI चंद्रचूड म्हणाले की, 'आजकाल आपण सर्वजण तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत, परंतु तरीही आपल्याला त्याबाबत अनेक प्रश्न आहेत.'

IIT मद्रासच्या (IIT Madras) 60 व्या दीक्षांत समारंभात पदवीधर विद्यार्थ्यांना संबोधित करताना CJI म्हणाले की, 'सोशल मीडियाने प्रत्येक वयोगटातील लोकांना जोडले आहे. परंतु या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने ऑनलाइन ट्रोलिंगला जन्म दिला आहे.'

हानिकारक हेतूंसाठी गैरवापर केला जात आहे

CJI चंद्रचूड म्हणाले की, 'AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) मध्ये व्यक्तींसोबत गैरव्यवहार करण्याची, दिशाभूल करण्याची, धमकावण्याची क्षमता आहे. यामुळेच हानीकारक हेतूंसाठी त्याचा गैरवापर रोखणे हे आपल्या सर्वांसमोरील प्रमुख आव्हानांपैकी एक असेल. टेक्नॉलॉजीचा (Technology) गैरवापर करुन वापरकर्त्यांच्या मनात भीती निर्माण करु नये.'

कायदा आणि टेक्नॉलॉजीमध्ये...

सरन्यायाधीश पुढे म्हणाले की, 'कायदा आणि टेक्नॉलॉजीमध्ये नेहमीच परस्पर संवाद असतो आणि दोघेही एकमेकांना पुढे घेऊन जातात.'

चंद्रचूड पुढे म्हणाले की, 'टेक्नॉलॉजीने आपली बोलण्याची आणि काम करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. कोरोना महामारीच्या काळात सर्वोच्च न्यायालयाने व्हर्च्युअल सुनावणी घेण्यास सुरुवात केली.' त्यांच्या मते, हे संवादाचे नवे माध्यम आहे.

व्हर्च्युअल सुनावणी महिला वकिलांना सुविधा देते

CJI पुढे म्हणाले की, 'व्हर्च्युअल सुनावणीच्या सुविधेमुळे वकील दिल्लीबाहेर राहूनही सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करु शकतात.' ते पुढे म्हणाले की, 'देशातील विविध न्यायालयांमध्ये आतापर्यंत 4.30 कोटी सुनावणी झाल्या आहेत.

या करोडो उदाहरणांवरुन व्हर्च्युअल सुनावणीमुळे महिला वकिलांना किती मदत झाली हे दिसून येते. महिला या नात्याने त्यांच्याकडून घरातील कामे करणे अपेक्षित असते, त्यामुळे त्यांना न्यायालयात येणे कठीण जाते.'

CJI चंद्रचूड पुढे म्हणाले की ,'व्हर्च्युअल सुनावणीची तरतूद हे सिद्ध करते की कायदा आणि टेक्नॉलॉजीमध्ये परस्परसंवाद अत्यंत महत्त्वाचा आहे.' सर्वोच्च न्यायालयाच्या व्हर्च्युअल सुनावणीत सहभागी महिला वकिलांना दिलासा दिल्याचे उदाहरणही त्यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT