IGF Annual Summit 2023 Dainik Gomantak
देश

IGF Annual Summit 2023: राजधानी दिल्लीत 27 मार्चला होणार IGF वार्षिक परिषद; महत्वाच्या विषयांवर होणार मंथन

जागतिक समस्यांवरील उपायांवर भारत ठरवणार दिशा; केंद्रीय मंत्र्यांचाही सहभाग

गोमंतक ऑनलाईन टीम

IGF Annual Summit 2023: 'सेटिंग द पेस' ही थीम घेऊन यंदाची इंडिया ग्लोबल फोरमची अॅन्युअल समिट होणार आहे. येत्या सोमवारी, २७ मार्च रोजी दिल्लीमध्ये ही परिषद होत आहे. हा कार्यक्रम स्टँडर्ड चार्टर्डने प्रायोजित केला आहे आणि VFS ग्लोबल आणि डेलॉइट हे नॉलेज पार्टनर आहेत. जागतिक समस्यांवरील उपायांवर भारताने दिशा ठरविण्याचा हा क्षण असणार आहे.

या परिषदेत एकूण 30 थीम असणार आहेत. 500 ​​हून अधिक जण यात सहभागी होणार आहेत. त्यामध्ये संस्थापक, व्यावसायिक, नेते, धोरणकर्ते आणि गुंतवणूकदार या सर्वांना एकत्र आणून जागतिक स्तरावर वेगाने बदल घडवण्यात भारत कसा लाभदायी ठरू शकतो, यावर विचारमंथन होईल.

या कार्यक्रमाचा फॉरमॅट थ्री इन वन असा आहे. आयजीएफ झोन- 35+ यात बिझनेस लीडर, धोरणकर्ते आणि रायझिंग स्टार्स असतील. ते टेक्नॉलॉजी आणि नाविण्य, शाश्वत विकास, विविधता आणि संधी, व्यापार आणि गुंतवणूक यासह विविध विषयांवर राऊंडटेबल चर्चा होईल.

द फोरम या सत्रात सरकार आणि बिझनेस क्षेत्रातील महत्वाची लोक मार्गदर्शन करतील. तर द आयजीएफ स्टुडियो यामध्ये नेतृत्व, जिओपॉलिटिक्स, हवामान, तंत्रज्ञान आणि इतर अशा जागतिक विषयांवर चर्चेचे प्रसारण होईल.

या कार्यक्रमाविषयी बोलताना आयजीएफचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. मनोज लाडवा म्हणाले, “जग बदलत आहे. जागतिक समस्यांवरील उपायांमध्ये दिशा ठरविण्याचा हा भारताचा क्षण आहे. पूर्वी जे अशक्य वाटत होते ते आता शक्य झालेले आहे.

जगाला असंख्य आव्हानांचा सामना करावा लागत असतानाही भारताची प्रगती सुरूच आहे. IGF वार्षिक शिखर परिषद नेत्यांना आणि बदल घडवणाऱ्यांना एकत्र आणून येत्या काही वर्षांत भारत कशी जागतिक विकासाची गती कशी वाढवू शकतो यावर विचारमंथन करेल.”

या परिषदेत केंद्रीय वाणिज्य, ग्राहक व्यवहार, वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल, महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी, रेल्वे-आयटी मंत्री अश्विनी वैष्णव, कामगार आणि रोजगार, पर्यावरण मंत्री मंत्री भुपेंद्र यादव सहभागी होणार आहेत.

सोशल मीडियाचे भवितव्य, कू, Google क्लाउड सेवा आणि भारत, नेट झिरो इमिशन, Sequoia Capital, विविधता, इन्क्लुजन, भारताचे जर्मनी, ब्रिटन, इस्त्रायलशी संबंध वृद्धींगत करणे, परदेशी गुंतवणूक, वेब ३, कॉईनबेस या विषयांवर याच विचारमंथन होणार आहे.

इंडिया ग्लोबल फोरम बद्दल हा आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि जागतिक नेत्यांसाठी अजेंडा-सेटिंग मंच आहे. आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट्स आणि धोरणकर्त्यांना त्यांच्या क्षेत्रांत धोरणात्मक महत्त्वाच्या लोकांशी संवाद साधण्यासाठी या व्यासपीठाचा वापर करू शकतात. अधिक माहितीसाठी www.indiaglobalforum.com या संकेतस्थळाला भेट देता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT