Missile Misfired in Pokhran: राजस्थानच्या जैसलमेरमध्ये लष्कराच्या 3 मिसाईल मिस फायर, चौकशी सुरू

यातील दोन क्षेपणास्त्राचे अवशेष सापडले आहे तर तिसऱ्या क्षेपणास्त्राचा शोध सुरू आहे.
Missile Misfired in Pokhran:
Missile Misfired in Pokhran: Dainik Gomantak
Published on
Updated on

राजस्थानच्या जैसलमेर येथील लष्कराच्या पोखरण फील्ड फायर रेंज येथे युद्ध सरावादरम्यान डागन्यात आलेल्या तीन मिसाइल मिस फायर झाल्या आहेत. या घटनेमुळे त्या परिसरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी हा युद्ध अभ्यास सुरू होता. दरम्यान, यातील दोन क्षेपणास्त्राचे अवशेष सापडले आहे तर तिसऱ्या क्षेपणास्त्राचा शोध सुरू आहे.

लष्कराचे प्रवक्ते अमिताभ शर्मा यांनी या घटनेला दुजोरा दिल आहे. ते म्हणाले की, आज पोलखरण फील्ड रेंज मध्ये वार्षिक युद्ध सराव सुरू असतांना एका युनिटने डागलेले तीन मिसाइल मिस फायर झाले.

हे मिसाइल हवेत नष्ट करण्यात आली आहेत. या मिसाइलचे अवशेष परिसरातील शेतात कोसळले असून ते ताब्यात घेण्यात आले आहेत. या घटनेत सुदैवाने जीवित हानी आणि मालमत्तेचे नुकसान झालेले नाही.

पण एका मिसाइलचे अवशेष सापडले नसून त्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

Missile Misfired in Pokhran:
Karnataka मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, मुस्लिमांचे ओबीसी आरक्षण रद्द; EWS कोट्यात मिळणार...

जमिनीवरून हवेत मारा करणारी मिसाइल हे सरावा दरम्यान डागन्यात आली होती. हे तिन्ही मिसाइल मिस फायर झाली. तीन वेगवेगळ्या ठिकाणी याचे अवशेष कोसळले आहेत. लष्कराचे एक पाठ आणि स्थानिक पोलिस शोध मोहीम राबवत असून दोन मिसाइलचे अवशेष सापडले आहे.

शुक्रवारी लष्करी सरावादरम्यान ही घटना घडली असुन हवेत असतांनाच या तिन्ही क्षेपणास्त्राचा स्फोट झाला. यानंतर फायरिंग रेंज बाहेर त्याचे तुकडे पडले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com