If Lord Krishna pleases, kangana ranaut will contest the Lok Sabha elections this year. Dainik Gomantak
देश

Kangana In Politics: सुपरफ्लॉप चित्रपटांच्या षट्कारानंतर, कंगनाला खुणावतेय राजकारणाचे मैदान

Kangana Ranaut ने 2015 मध्ये केलेला 'तनू वेड्स मनू' शेवटचा हिट चित्रपट होता. त्यानंतर कंगणाचे कट्टी बत्ती, रंगून, सिमरन, मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी, पंगा, थलाईवी आणि तेजस असे सलग सहा चित्रपट सुपरफ्लॉप ठरले आहेत.

Ashutosh Masgaunde

If Lord Krishna pleases, kangana ranaut will contest the Lok Sabha elections this year:

कंगना राणौतची फिल्मी इनिंग सध्या डळमळीत झाली आहे. ती सतत एकामागून एक फ्लॉप चित्रपट देत आहे.

कंगणाने 2015 मध्ये केलेला 'तनू वेड्स मनू' शेवटचा हिट चित्रपट होता. त्यानंतर कंगणाचे कट्टी बत्ती, रंगून, सिमरन, मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी, पंगा, थलाईवी आणि तेजस असे सलग सहा चित्रपट सुपरफ्लॉप ठरले आहेत.

आता कंगणाने राजकारणात येण्याचे संकेत दिले आहेत. गुजरातमधील द्वारकाधीश मंदिराला भेट दिल्यानंतर कंगना राणौतने केलेल्या विधानंतर, ती राजकारणात येण्याची शक्यता आहे.

तेजस चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर कंगना गुजरातचे प्रसिद्ध पर्यटन स्थळ द्वारकाच्या जगत मंदिरात पोहोचली होती. तिने द्वारकाधीशाचे दर्शन घेतले. त्यानंतर कंगनाने नागेश्वर महादेव मंदिरालाही भेट दिली.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कंगनाने पहिल्यांदाच सांगितले की, जर भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले तर ती यंदा लोकसभा निवडणूक लढवेल.

काही दिवस माझे मन खूप व्याकुळ झाले होते, द्वारकाधीशाचे दर्शन घ्यावेसे वाटले, श्री कृष्णाच्या या दिव्य नगरी द्वारकेत येताच येथील माती पाहून माझ्या सर्व काळजाचा ठोका चुकल्यासारखे वाटले. माझे मन स्थिर झाले आणि मला आनंद वाटला. हे द्वारकेच्या स्वामी, तुझा आशीर्वाद असाच ठेव.
द्वारका भेटीनंतर कंगणाची इन्स्टाग्राम पोस्ट

नुकत्याच आलेल्या तेजस या चित्रपटात कंगना राणौत दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही.

कंगनाने तिची मानसिक आणि भावनिक स्थिती आणि द्वारकाधीश मंदिराला भेट दिल्याने तिचे दुःख कसे कमी झाले याबद्दल सांगितले.

कंगनाने मंदिराच्या आतील अनेक फोटोही शेअर केले आहेत. हे मंदिर गुजरातच्या द्वारका शहरात आहे. कंगना सोनेरी साडी नेसून मंदिरात दर्शनासाठी आली होती.

कामाच्या बाबतीच बोलायचे झाल्यास, तिचा 'तेजस' गेल्या आठवड्यात पडद्यावर आला. सर्वेश मेवारा-दिग्दर्शित चित्रपट हा भारतीय वायुसेनेचा पायलट तेजस गिल या भारतीय गुप्तहेराची सुटका करण्याच्या मोहिमेवर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ 2nd Test: 'तो आतून खचला असेल...' सिराजला पुन्हा संघाबाहेर ठेवल्यानं दिग्गज भडकले! कैफ, मुनाफ पटेल अन् जाफर यांनी निवडकर्त्यांना घेतलं फैलावर

ST Reservation: आरक्षणाचा तिढा सोडवण्यास सरकार सरसावले; 7 डिसेंबरपासून सुनावणी, केंद्राचे प्रतिज्ञापत्र सादर

Student Visa Fraud: मुलीला कॅनडात शिकवण्याचे स्वप्न पडले महागात; व्हिसाच्या आमिषाने लाखोंचा गंडा

999cc इंजिन, 215 bhp पॉवर अन् 300 किमी प्रतितासापेक्षा जास्त वेग! BMW ची सर्वात दमदार सुपरबाईक भारतात लॉन्च; किंमत जाणून घ्या

Under 11 National Badminton: गोव्याची अमायरा धुमटकर विजेतेपदाच्या उंबरठ्यावर, 11 वर्षांखालील राष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये छाप

SCROLL FOR NEXT