ICSE and ISC Exam Result 2023: Dainik Gomantak
देश

ICSE and ISC Exam Result 2023: ICSE 10 वी अन् ISC 12 वी चा निकाल आज होणार जाहीर; 'असा' पाहा निकाल

केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई आणि आयएससी च्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे.

दैनिक गोमन्तक

ICSE and ISC Exam Result 2023: सीबीएसईचा निकाल जाहिर झाल्यानंतर आता कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (CICSE) या केंद्रीय मंडळाच्या आयसीएसई (10) (ICSE)आणि आयएससी (12) (ISC) च्या परीक्षेचा निकाल आज (14 मे) दुपारी 3 वाजता मंडळाच्या cisce.org आणि results.cisce.org या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. मंडळाकडून परीक्षेच्या निकाला संदर्भात घोषणा करण्यात आली आहे.

दहावी, बारावी परीक्षांचे निकाल CISCE च्या CAREERS पोर्टलवर आणि CISCE च्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना (Student) उपलब्ध करून देण्यात येतील. यामध्ये विद्यार्थ्यांना आपले आयडी आणि पासवर्ड वापरून करिअर्स पोर्टलवर log in करायचे आहे. 

CAREERS पोर्टलवर निकाल पाहण्यासाठी 'या' स्टेप्स कराव्या फॉलो

1. करिअर्स पोर्टलवर Log In केल्यावर,'Examination' टायटलवर क्लिक करा.

2. मुख्य मेन्यू बारवर ICSE (१०) वर्ष 2023 परीक्षेचे निकाल पाहण्यासाठी 'ICSE' वर क्लिक करा आणि ISC (१२) वर्ष 2023 परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी 'ISC' वर क्लिक करा.

3. ICSE / ISC मेन्यूमधून 'Reports' वर क्लिक करा.

4. शाळेच्या निकालाची प्रिंट आउट घेण्यासाठी 'Result Tabulation' वर क्लिक करावे.

5. निकालाची प्रिंट तपासण्यासाठी 'Comparison Table' वर क्लिक करावे.

CISCE च्या वेबसाईटला भेट देऊन विद्यार्थी https://cisce.orq किंवा https:llresults.cisce.orq या वेबसाईटद्वारे निकाल पाहु शकतात.

  • सीआयएससीईच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी 'या' स्टेप्स करा फॉलो

1. ICSE (10) 2023 परीक्षेच्या निकालांमध्ये प्रवेश करण्यासाठी, Course ऑप्शनमधून ICSE निवडा आणि ISC (10) 2023 परीक्षेच्या निकालांमध्ये प्रवेश करण्यासाठी Course ऑप्शनमधून ISC निवडा.

2. निकाल पाहण्यासाठी युनिक आयडी, निर्देशांक क्रमांक आणि CAPTCHA (स्क्रिनवर दाखविल्याप्रमाणे) Enter करा.

3. निकालाची प्रिंट आउट घेण्यासाठी " प्रिंट " या बटणावर क्लिक करा.

आयसीएसई मार्फत देश-विदेशातील विविध परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा 27 फेब्रुवारी ते 29 मार्च 2023 या कालावधीत घेण्यात आली होती. तर बारावीची (ISC) परीक्षा 29 फेब्रुवारी रोजी सुरू झाली होती.

ती 31 मार्च 2023 पर्यंत ही परीक्षा चालली होती. यावेळी मंडळाकडून सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 15 मिनिटांचा अधिकचा वेळ देण्यात आला होता. तर यंदाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेला देश-विदेशातील परीक्षा केंद्रांवर सुमारे 2.5 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोगो'वरुन गदारोळ, युरी आलेमावांनी गॅझेट फाडून हवेत भिरकावले, खुर्च्या उचलण्याचा प्रयत्न; MLA वीरेश बोरकरांना काढले सभागृहातून बाहेर

eSakal No 1: ई-सकाळचा करिष्मा कायम! 21.2 दशलक्ष वाचकांसह पुन्हा 'नंबर वन'

Video: चोरट्याची फजिती! स्कूटी घसरली, हेल्मेट पडलं अन् स्वतःही पडला; सोशल मीडियावरील 'हा' व्हिडिओ एकदा बघाच

IND vs ENG 4th Test: ओल्ड ट्रॅफर्डवर जो रुटचा दबदबा, द्रविड-कॅलिसला मागे टाकून रचला इतिहास; नावावर केला 'हा' मोठा रेकॉर्ड

Goa Assembly: पोगो ठरावावरुन विधानसभेत राडा, सभापती संतापले, वीरेश बोरकरांना सभागृहातून काढले बाहेर; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT