Mortal remains of Flight Lieutenant Advitiya Bal reaches his native place in Jammu ANI
देश

IAF MiG Crash: फ्लाइट लेफ्टनंट अद्वितिय बल यांचे पार्थिव जम्मूमध्ये दाखल, गावकऱ्यांना अश्रू अनावर

बाडमेरमधील बैतू पोलीस स्टेशन हद्दीतील भीमडा गावाजवळ गुरुवारी रात्री हवाई दलाचे मिग विमान कोसळले, ज्यात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला

दैनिक गोमन्तक

Aircraft crash in Rajasthan: बाडमेरमधील बैतू पोलीस स्टेशन हद्दीतील भीमडा गावाजवळ गुरुवारी रात्री हवाई दलाचे मिग विमान कोसळले. विमान जमिनीवर पडताच जोरात आग लागली. अपघातग्रस्त विमानाचा अवशेष अर्धा किलोमीटरपर्यंत पसरला होता. या अपघातात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. मिग अपघाताच्या बातमीने गावात घबराट पसरली होती. घटनेची माहिती मिळताच विमानतळ आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. (Mortal remains of Flight Lieutenant Advitiya Bal reaches his native place in Jammu)

दरम्यान, आज 28 जुलै रोजी राजस्थानमधील बाडमेर येथे मिग-21 लढाऊ विमान अपघातात मृत्युमुखी पडलेले फ्लाइट लेफ्टनंट अद्वितीय बल यांचे पार्थिव जम्मूमध्ये त्यांच्या मूळ गावी पोहोचले आहे. मुलाच्या मृत्यूच्या वृत्ताने अस्वस्थ झालेल्या आई-वडिलांना सांभाळणे कणीण होत आहे. कुटुंबातील इतर सदस्यांचीही अवस्था वाईट आहे. हर्षित बाल हा हे अद्वितीय बाल चा धाकटा भाऊ आहे, त्यालाही अश्रू अनावर होत आहे.

मिग-21 अपघातात भारतीय वायुसेनेने एक निवेदन जारी करून दोन्ही वैमानिकांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. निवेदनानुसार, ट्विन सीटर मिग-21 बायसन ट्रेनर विमानाने राजस्थानमधील उत्तरलाई हवाई तळावरून रात्री 9:30 वाजता उड्डाण केले होते. आता हे विमान प्रशिक्षण विमान होते. अपघाताचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत.

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विमान जमिनीवर आदळताच त्याला मोठी आग लागली. विमान जिथे पडले तिथे जमिनीत 15 फूट खड्डा पडला होता. ज्वाळा दूरवर दिसत होत्या. रात्रीच्या अंधारामुळे बचावकार्यात अडचणी येत होत्या.' संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करताना शोकसंतप्त कुटुंबियांबद्दल सद्भावना व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT