Hyderabad Viral Video Dainik Gomantak
देश

Video : लग्नसमारंभात वराला हळद लावायला गेला आणि जीव गमावला; नेमकं काय झालं हे एकदा बघाच

हल्ली अनेकांना अचानक हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे.

दैनिक गोमन्तक

Hyderabad Viral Video : हल्ली अनेकांना अचानक हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. हैदराबादमधून एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे, जिथे लग्नसमारंभात आनंदाचे वातावरण होते, अशा ठिकाणी काही वेळातच त्याचे रूपांतर दुःखात झाले. माहितीनुसार, हैदराबादच्या काला पत्थर भागात लग्नसोहळा सुरू होता. यादरम्यान अचानक एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला.

हळदीचा कार्यक्रम सुरू असताना एक नातेवाईक वराला हळद लावायला गेला आणि काही सेकंदातच त्याचा मृत्यू झाला. हळद लावत असतानाच अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो तिथेच कोसळला. या सोहळ्यात उपस्थित काही व्यक्तींनी हा हृदयद्रावक प्रसंग आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, हृदय पिळवटून टाकणाऱ्या व्हिडिओमध्ये रब्बानी नावाचा एक व्यक्ती वराच्या समोर बसलेला दिसत आहे. तो हसत-हसत वराला हळद लावत आहे. पण मग अचानक तो पडतो. यानंतर तिथे प्रचंड गदारोळ झालेला दिसत आहे.

इथे पहा हा व्हायरल व्हिडिओ

या व्यक्तीला उचलण्यासाठी वराचीही धावपळ झाली. इतर लोकही मदतीला पुढे आले. एवढेच नाही तर व्हिडिओमध्ये एका मुलाच्या रडण्याचा आवाजही ऐकू येत आहे. कुटुंबीयांनी रब्बानी यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेले, मात्र त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत, असे सांगण्यात येत आहे. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांची कारवाई! सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT