Mokila Hyderabad Police Three held with drugs from Goa Dainik Gomantak
देश

त्यांना नशेची सवय झाली, गोव्यातून ड्रग्ज खरेदी करुन हैद्राबादमध्ये विक्री; तस्करीप्रकरणी तिघांना अटक

गोव्यातून हैद्राबादमध्ये येणाऱ्या या ऑर्डरीची माहिती पोलिसांनी मिळाली आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

Pramod Yadav

Mokila Hyderabad Police Three held with drugs from Goa: अमली पदार्थ तस्करीप्रकरणी हैद्राबाद पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. गोव्यातून हैद्राबादमध्ये 51 ग्रॅम कोकेन, 44 ग्रॅम वजनाच्या अमली पदार्थाच्या गोळ्या आणि स्फटीक स्वरूपातील एमडीएमए असे 97,500 रुपये किंमतीचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे.

गोव्यातून हैद्राबादमध्ये येणाऱ्या या ऑर्डरीची माहिती पोलिसांनी मिळाली आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

लिंगमपल्ली अनुराधा (वय 34, रा. गचीबौली), सनिकोम्मू प्रभाकर रेड्डी (वय 38, रा. गचीबौली) आणि वेंकट शिवा साई कुमार (वय 33, रा. जुबली हिल्स) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

तिघेही वारंवार अमली पदार्थांचे सेवन करत होते आणि त्याची त्यांना सवय झाली होती. गचीबौली येथे राहणारी अनुराधा गोव्यातील पेडलरशी संपर्क करून, त्यांच्याकडून अमली पदार्थ विकत घेऊ लागली. तिच्याकडे अमली पदार्थ आल्यानंतर पुढे ती प्रभाकर रेड्डी याच्याकडे विक्रीसाठी देत असते.

प्रभाकर गचीबौली येथे टिफिनचा व्यवसाय चालवतो अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मागणी वाढल्यानंतर प्रभाकर आणि अनुराधा दोघांनी गोव्यातून अमली पदार्थ खरेदीला सुरूवात केली. खरेदी केलेले अमली पदार्थ दोघेही शहारातीसल विविध भागात विक्री करत. त्यापैकी साई कुमार हा देखील एक ग्राहक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गोव्यातून येणाऱ्या मोठ्या ऑर्डरची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानंतर मोकिला परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी 97,500 रुपये किंमतीचे अमली पदार्थ, पाच मोबाईल फोन आणि तीन कार असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी मोकिला पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

UTAA: प्रकाश वेळीपना धक्‍का! ‘उटा’च्या विद्यमान समितीवर निर्बंध; सभा-आर्थिक व्‍यवहार करण्यास मनाई

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

SCROLL FOR NEXT