Hyderabad Bus Accident  Twitter / ANI
देश

लेकीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करुन घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला

गोव्यातून हैदराबादला परतणाऱ्या पर्यटकांच्या बसला अपघात; 10 जणांचा होरपळून मृत्यू

दैनिक गोमन्तक

हैदराबाद : गोव्याहून हैदराबादला जाणाऱ्या बसचा कर्नाटकच्या कमलापूरजवळ भीषण अपघात झाला आहे. एका मिनी ट्रकला धडक दिल्यानंतर बसने पेट घेतला आणि या अपघातात 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला. आता या अपघाताबाबत नवी माहिती समोर येत आहे. गोव्यात सेलिब्रेशनसाठी आलेल्या पर्यटकांवर काळाने घाला घातला आहे. (Hyderabad Bus Accident)

हैदराबादमधील अर्जुन कुमार आपल्या मुलीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी गोव्यात आले होते. या सेलिब्रेशनमध्ये कुटुंबीय आणि मित्रमंडळींना सहभागी करता यावं म्हणून त्यांनी खास बसही केली होती. सुमारे 28 जण गोव्यात या सेलिब्रेशनसाठी आले होते. मात्र या सेलिब्रेशनचा आनंद कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर फार काळ टिकू शकला नाही. गोव्यातून हैदराबादला माघारी परतताना घात झाला आणि 10 जणांचा बस अपघातात होरपळून मृत्यू झाला.

शुक्रवारी सकाळी कर्नाटकमधील कमलापूर भागामध्ये एका लॉरीसोबत बसची धडक झाल्याची माहिती समोर आली आहे. ही धडक एवढी जोरदार होती की जागीच बसने पेट घेतला. सकाळी साडेसहा वाजण्याच्या आसपास हा अपघात झाल्यामुळे बसमधील बहुतेक प्रवासी झोपेतच होते. त्यामुळे अपघातानंतर बाहेर पडण्याची संधीही त्यांना मिळाली नाही. दरम्यान बसचालकाचा डुलकी लागून बसवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

अपघातातील जखमींना कलबुर्गीतील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. पोलीस अधीक्षक इशा पंत यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदतकार्य पुरवलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT