गोव्याहून हैदराबादला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, 10 जणांचा मृत्यू

कर्नाटकातील कमलापूरजवळ झालेल्या बस अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
Accident
AccidentTwitter / ANI
Published on
Updated on

कर्नाटकातील कमलापूरजवळ झालेल्या बस अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. ही बस गोव्याहून हैदराबादला जात होती. मिनी ट्रकला धडक दिल्यानंतर बसने पेट घेतला. वाढदिवस साजरा करण्यासाठी गोव्यात असलेले एक कुटुंब हैदराबादला परतत असताना हा अपघात झाला. हैदराबादस्थित अर्जुन कुमारचे कुटुंब आणि मित्रांसह 28 लोक लेकीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गोव्याला गेले होते. हा अपघात झाला तेव्हा ते परतत होते. (10 people have died in bus accident was travelling from Goa to Hyderabad)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 29 प्रवासी गोव्याहून हैदराबादला जात होते. “प्राथमिक तपासणीनुसार, बस आणि मालवाहू वाहनाचा अपघात झाल्यानंतर आग लागली. सर्व जखमींना कलबुर्गी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.''

Accident
कोलवाळ कारागृहाबाहेर सुरक्षा रक्षकाकडे सापडले ड्रग्स

दुसरीकडे, पोलीस अधीक्षक ईशा पंत यांनी अपघातस्थळी आणि रुग्णालयांना भेट देऊन जखमी प्रवाशांची प्रकृती जाणून घेतली. माध्यमाशी बोलताना पंत म्हणाले, "आम्ही अपघाताची सखोल चौकशी करत आहोत. सर्व जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गोव्याहून हैदराबादकडे निघालेली बस कमलापूरमध्ये एका मालवाहू वाहनाला धडकली. टक्कर झाल्यानंतर बस काही अंतरावर जाऊन उलटली आणि आग लागली, असे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.”

परिवहन मंत्री बी श्रीरामुलू म्हणाले, "शुक्रवारी सकाळी 6.30 वाजता गोव्याहून (Goa) हैदराबादला (Hyderabad) निघालेल्या बसला अपघात झाला, त्यानंतर तिला आग लागली आणि दोन मुलांसह सात जणांचा मृत्यू झाला."

Accident
कोलवाळ तुरुंगातील सुरक्षा रक्षकच असुरक्षित!

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी पीडितांबद्दल शोक व्यक्त केला. “कलबुर्गी बस दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून मला दुःख झाले. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी माझी इच्छा आहे, असे त्यांनी एका मीडिया निवेदनात म्हटले आहे.

Accident
गोवाः 'त्या' घटनेमुळे कोलवाळ कारागृहाच्या सुरक्षा यंत्रणेत बदल

याशिवाय, प्रदेश काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष डीके शिवकुमार यांनीही शोक व्यक्त केला. “कमलापूर, कलबुर्गी येथे बसला लागलेल्या आगीत किमान 10 लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. बाधित कुटुंबांप्रती माझ्या संवेदना आहेत. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे, अशी माझी इच्छा आहे,” असे त्यांनी ट्विट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com