Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: लव्ह, फन आणि ताकद! नवऱ्यांना उचलून बायकांनी लावली आगळीवेगळी शर्यत, व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

Unique Race Video Viral: सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका आगळ्यावेगळ्या शर्यतीचे दृश्य पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

Manish Jadhav

Unique Race Video Viral: सोशल मीडिया हे व्हायरल कंटेंटचे एक प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला कधीही कंटाळा येणार नाही, कारण लोक दिवसभर काही ना काही पोस्ट करतच असतात. याच पोस्टमधून अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होतात. जे व्हिडिओ सगळ्यात हटके असतात किंवा जे लोकांचे लक्ष वेधून घेतात, ते लगेच व्हायरल होतात. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका आगळ्यावेगळ्या शर्यतीचे दृश्य पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

आधी हा व्हिडिओ पाहा

नवऱ्याला कमरेवर घेऊन बायका धावल्या

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक अनोखी शर्यत पाहायला मिळते. व्हिडिओच्या एका बाजूला काही महिला उभ्या आहेत, तर दुसऱ्या टोकावर त्यांचे नवरे उभे आहेत. शर्यतीची सुरुवात होताच सर्व महिला (Womens) आपल्या नवऱ्यांकडे धावत जातात. तिथे पोहोचल्यावर त्या आपापल्या नवऱ्यांना कमरेवर उचलून घेतात आणि पुन्हा मागे धावत येतात. ज्या ठिकाणाहून त्यांनी शर्यत सुरु केली होती, त्याच ठिकाणी त्या परत येतात.

अनोख्या रेसने वेधले लक्ष

अशा प्रकारची शर्यत सहसा कुठेही पाहायला मिळत नाही आणि म्हणूनच हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एक्स (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @VishalMalvi_ नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये म्हटले की, “आम्हा मुलांना आमच्या आवडत्या मुलीकडून असेच 'प्रिन्स ट्रीटमेंट' हवे आहे.”

व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून त्याला लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट केली आहे, “त्यासाठी तुम्हाला 'साईज झीरो' बनावे लागेल.” दुसऱ्या एका युजरने म्हटले की, "वजन कमी असले पाहिजे." तर आणखी एकाने लिहिले आहे, "अरे गजब!" अनेक यूजर्संनी व्हिडिओमधील महिलांच्या ताकदीचे कौतुक केले आणि ही शर्यत खूपच मजेदार असल्याचे म्हटले. या अनोख्या शर्यतीने सोशल मीडियावर (Social Media) एक नवा ट्रेंड सुरु केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: पाकडे नाही सुधारणार! LIVE सामन्यात शिवीगाळ करत 'लज्जास्पद' कृत्य Watch Video

Morjim Beach: गोव्याच्या 'मोरजी बीच'वर बैलांची झुंज, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Watch Video

Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरण, 'आय 20' कारचा मालक आमिर अटकेत; दहशतवादी डॉ. उमरसोबत आखली होती स्फोटाची योजना

Viral Video: पैशांसाठी तरुणीला शिवीगाळ, MNS कार्यकर्ते आक्रमक; परप्रांतीय तरुणाला कार्यालयात बोलावून चोपलं

Gautam Gambhir Angry: "टेम्बा बावुमाची बॅटिंग पाहा..." टीम इंडियाच्या 'फ्लॉप शो'वर गंभीर भडकला; फलंदाजांच्या क्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह Watch Video

SCROLL FOR NEXT