Crime News Dainik Gomantak
देश

मित्रासोबत जुगारात हारला, पैशांच्या बदल्यात त्याने पत्नीलाच...; बरेलीतील गलिच्छ प्रकार

Uttar Pradesh Crime: बरेली जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगारात एका तरुण दोन लाख रुपये हरला.

Manish Jadhav

Uttar Pradesh Crime: बरेली जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगारात एक तरुण दोन लाख रुपये हरला. पैसे नसल्याने त्याने पत्नीला आपल्या जुगारी मित्राला सोपवले.

दरम्यान महिलेने आपल्या मुलीसह पळून जाण्याचा प्रयत्न केला असता तिला ओलीस ठेवून मारहाण करण्यात आली. सध्या पोलिसांनी पतीसह सासरच्या चार जणांवर एफआयआर दाखल केला आहे.

महिलेने सांगितले की, तिचे सासरचे लोक हुंडा म्हणून अडीच लाख रुपयांची मागणी करत होते. तर पती गौरव वर्मा दारु पिऊन रात्रभर जुगार खेळायचा आणि शिवीगाळ करायचा. मात्र, विरोध केला असता सासरच्यांनी तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने खोलीत कोंडून ठेवले.

महिलेने (Women) पुढे सांगितले की, गौरव जुगारात दोन लाख रुपये हरला होता. त्याचदम्यान त्याने एका व्यक्तीला रुममध्ये आणले. जर तु त्याला खुश केले तर दोन लाख रुपये माफ करु, असे त्याने त्याला सांगितले होते. हे ऐकून ती खूपच घाबरली आणि तिने तिथून आपल्या मुलीसह पळ काढण्याचा प्रयत्न केला.

पती, सासू, सासरे आणि मेहुण्याविरुद्ध गुन्हा दाखल

याचदरम्यान, सासरच्यांनी तिला पकडून खोलीत ओलीस ठेवले आणि मारहाण केली. आरोपी मेव्हणा शुभमने तिचा विनयभंग केला. यानंतर तिला मारहाण करुन घराबाहेर हाकलून दिले होते. तेव्हापासून ती तिच्या माहेरी राहत होती.

प्रेमनगर पोलिसांनी आरोपी - पती, सासरा, सासू, सासरे यांच्या विरोधात हुंडा, मारहाण, धमकावणे, विनयभंग अशा विविध कलमांखाली एफआयआर (FIR) दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा एकदम दणक्यात! सरकारकडून महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची घसघशीत वाढ; मिळालं तगडं गिफ्ट

Kumar Kushagra Century: भारतीय फलंदाजीचा नवा हुकमी एक्का! 21 वर्षाच्या पोरानं ठोकलं शानदार शतक, कांगारुंची काढली पिसं; सिलेक्टर्सचं वेधलं लक्ष

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

SCROLL FOR NEXT