digital career growth Dainik Gomantak
देश

युवकांनी डिजिटल फूटप्रिंट्सचा वापर ऑनलाईन प्रेझेन्स बिल्ट करण्यासाठी कसा करावा?

online presence for students: युवकांसाठी तर डिजिटल तंत्रज्ञान हे केवळ मनोरंजनाचे व माहिती घेण्याचे साधन राहिले नसून ते वयक्तिक ओळख निर्माण करण्याचे साधन ठरले आहे

गोमंतक ऑनलाईन टीम

Digital Footprints Strategies: आपण डिजिटल युगात राहतो. जगातील सगळीच क्षेत्रे ही डिजिटल मीडियाशी नुसतीच जोडली गेलेली नसून, आज आपण प्रत्येकजण त्याच्याशी जोडले गेले आहोत. युवकांसाठी तर डिजिटल तंत्रज्ञान हे केवळ मनोरंजनाचे व माहिती घेण्याचे साधन राहिले नसून ते वयक्तिक ओळख निर्माण करण्याचे साधन ठरले आहे. युवकांनी त्याचा फायदा आपली कारकीर्द घडवून घेण्यासाठी नक्कीच करून घेतला पाहिजे.

डिजिटल फूटप्रिंट म्हणजे काय?

डिजिटल फूटप्रिंट म्हणजे इंटरनेटवर केलेल्या कुठल्याही कृतीचा ऑनलाईन उपस्थितीचा ठसा. यामध्ये तुमच्या सोशल मीडियावर तुम्ही केलेली कुठलीही पोस्ट, वेबसाईटवर दिलेली माहिती, ब्लॉग, व्हिडीओज, कॉमेंट्स यांसारख्याइतर कुठल्याही डिजिटल साधनांचा वापर करून केलेल्या कृतीचा सामावेश होतो.

सोप्या भाषेत सांगायचे तर आपण इंटरनेटवर जे काही करतो ते आपले डिजिटल फूटप्रिंट असतात. एखाद्या व्यक्तीची किंवा व्यवसायाची ऑनलाईन प्रतिमा कशी आहे, त्यांची विश्वासहर्ता कशी आहे, ते कोणत्याप्रकारे लोकांशी संवाद साधतात ते या फूटप्रिंट वरून लक्षात येते. डिजिटल फूटप्रिंटस हे 'ब्रँड' ओळख निर्माण करण्याचे एक शक्तिशाली साधन आहे. ते जितके प्रभावी, स्पष्ट आणि निटनिटके असेल तितके आपले डिजिटल अस्तित्व भक्कम असते आणि आपल्या इतर स्पर्धकांमध्ये ते उठून दिसते. याचा विचार पूर्वक आणि योग्य प्रकारे फायदा करून घेतला तर युवकांना त्याचा चांगला फायदा त्यांच्या करियरसाठी करून घेता येऊ शकतो.

ऑनलाईन प्रेझेन्स निर्माण करण्याचे फायदे :

आपण पुढे व्यवसाय करणार आहात का नोकरी? हे युवकांचे निश्चित झाले नसले तरी आपला ऑनलाईन प्रेझेन्स हा या दोन्ही ठिकाणी फायद्याचाच ठरतो. त्यातून अनेक संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. आज अनेक कंपन्या आपल्या उमेदवारांची निवड करताना डिजिटल माध्यमांचा आधार घेतात.

वैयक्तिक ब्रँड तयार करणे :

प्रत्येकामध्ये काही गुण असतात. तुमच्यामध्ये असलेल्या कला गुणांना डिजिटल माध्यमांची योग्य प्रकारे जोड देऊन आपली तज्ज्ञता, कौशल्य आवडी यांना तुम्ही जगा समोर आणू शकता व आपला ब्रँड तयार करू शकता. त्यामुळे लोक तुम्हाला तुमच्या क्षेत्रात तज्ज्ञ म्हणून ओळखतात.

रोजगाराच्या संधी निर्माण करणे :

तुम्ही ज्या क्षेत्रात नोकरी करू इच्छितात त्या क्षेत्राचे ज्ञान तुम्हाला किती आहे हे तुम्ही निवडक डिजिटल माध्यमांवर अभ्यासपूर्ण मांडले तर त्याची दखल घेतली जाऊ शकते. Linkedin सारख्या माध्यमांवर तुमची माहिती योग्य प्रकारे अपडेटेड ठेवल्यास नोकरीच्या किंवा प्रकल्पांच्या संधी सहज मिळू शकतात.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स द्वारे आपण मोठ्या प्रमाणात लोकांशी संपर्क साधू शकतो. वैयक्तिक ब्रँड तयार करण्यासाठी फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्ड इन, ट्विटर या प्लॅटफॉर्म्सचा उपयोग होऊ शकतो. ब्लॉगिंगद्वारे आपले विचार, ज्ञान मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहचवू शकतो त्यासाठी वर्डप्रेस, मिडीयम, ब्लॉगर या प्लॅटफॉर्म्सचा वापर केला जाऊ शकतो.

तसेच यु-ट्यूब वर व्हिडीओच्या माध्यमातून माहिती, मनोरंजन आणि शिक्षण प्रदान करू शकता. याखेरीज देखील अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. आपल्यासाठी कुठला प्लॅटफॉर्म योग्य आहे याची निवड करता आली पाहिजे.

ऑनलाईन प्रेझेन्स हे केवळ एक डिजिटल साधन नसून ते तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक यशाचा पाया ठरू शकते. योग्य दिशेने प्रयत्न करून युवकांनी आपल्या ओळखीला नवा आयाम द्यावा आणि डिजिटल माध्यमांमधील संधींचा पुर्ण लाभ घ्यावा.

- पराग गोरे

(डिजिटल फूटप्रिंट एक्स्पर्ट, बिझनेस आयकॉन)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: छत्रीमुळे गेला जीव! स्कुटरवरून पडून महिलेचा दुर्दैवी अंत

Goa Crime: सुट्टी असतानाही गणवेशात घरातून निघाल्या; दोन शाळकरी मैत्रिणी बेपत्ता, कुंकळ्ळी पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल

Goa Opinion: आधी 'मौजमजा करण्यासाठी गोव्यात या' म्हणणारे, आता ‘गोवाच विकत घ्या’ म्हणताहेत..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Goa Live News Updates: गोवा डेअरीच्या दूध उत्पादकांना 12 कोटी 70 लाख रुपये मंजूर

SCROLL FOR NEXT