How many hours do you sleep Excessive sleep can increase risk of stroke  Dainik Gomantak
देश

तुम्ही किती तास झोप घेता? अती झोपेमुळे वाढू शकतो स्ट्रोकचा धोका

परंतु दररोज जास्त झोपणे हे वैद्यकीयदृष्या चिंताजनक ठरू शकते. काळ आणि जीवनशैली बदलल्यामुळे पक्षाघाताचा लक्षणामंध्येही लक्षणीय बदल झाला आहे

दैनिक गोमन्तक

आठवड्याच्या शेवटी जास्त झोपणे हा सगळ्यांचा आवडीचा भाग आहे या बिझी लाइफ स्टाइल मध्ये अपुरी झोप झाल्याने थकवा जणवतो आणि हा थकवा घालवण्यासाठी आपण सुट्टीच्या दिवशी जास्त वेळ झोपतो. परंतु दररोज जास्त झोपणे हे वैद्यकीयदृष्या चिंताजनक ठरू शकते. वैद्यकिय अभ्यासातून असे दिसून आले आहे की जे लोक दिवसातून सहा ते आठ तास झोपतात त्यांना स्ट्रोकचा त्रास होण्याची शक्यता असते. काळ आणि जीवनशैली बदलल्यामुळे पक्षाघाताचा लक्षणामंध्येही लक्षणीय बदल झाला आहे.

दिवसभर बैठकिचे काम असल्यामुळे आणि बिझी लाइफस्टाइलमुळे 25 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरूणांमध्ये अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत जात आहे, ज्यामुळे स्ट्रोक होऊ शकतात. संशोधकांनी 11 डिसेंबर 2019 रोजी अमेरिकन अकादमी ऑफ न्यूरोलॉजीच्या वैद्यकीय जर्नल 'न्यूरॉलॉजी' जर्नलच्या ऑनलाइन आवृत्तीमध्ये सरासरी 62 वर्षे वय असलेल्या 32,000 हून अधिक व्यक्तींमधील स्ट्रोकच्या जोखमीच्या मूल्यांकनावर चर्चा केली.

संशोधनाच्या लेखकांनी स्ट्रोकचा अभ्यास करतांना काही लोकांवर अभ्यास केला ज्यातून असे स्पष्ट झाले की झोपेची तक्रार करणाऱ्यांमध्ये स्ट्रोकचा धाका जास्त प्रमाणात दिसून आला. चीनच्या वुहान येथील हुआझोंग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे डॉ झिओमिन झांग हे या अभ्यासाचे लेखक आहेत. जेव्हा स्ट्रोक होतो तेव्हा मेंदूच्या एखाद्या भागामध्ये रक्त प्रवाह विस्कळीत होतो किंवा कमी होतो, ज्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो आणि त्यामुळे मेंदूला नुकसान पोहचते. अभ्यासानुसार, जे लोक रात्री आठ ते नऊ तास किंवा त्याहून अधिक वेळ झोपतात त्यांना स्ट्रोकचा धोका 23% जास्त असतो. शिवाय, जे लोक दिवसा वामकुक्षी घेतात ते कमीतकमी 90 मिनिटे झोपतात त्यांना 30 मिनिटांपेक्षा कमी झोपलेल्या लोकांपेक्षा स्ट्रोक होण्याची शक्यता 25% जास्त असते. त्याचप्रमाणे जे लोक जास्त वेळ झोपतात पण शांत झोपे लागत नसल्याची तक्रार करतात त्यांना स्ट्रोकचा धोका 82% वाढतो.

स्ट्रोकनंतरही झोपेचा त्रास बर्‍यापैकी वारंवार होतो; त्यानंतरच्या एका महिन्यांमध्ये ५० टक्के लोकांना झोपेचा त्रास होतो. झोप पुरेशी आणि शांत न होणे अनेक समस्या निर्माण करू शकते. उदासीनता निर्माण करू शकते आणि स्मरणशक्तीच्या समस्या देखील निर्माण करू शकते.

अभ्यासात जास्त झोप, दुपारची जास्त वेळ झोपणे किंवा अशांत झोपे यांचा संबंध स्ट्रोक सोबत लावला गेला आहे. याचे कनेक्शन आणि दिलेले कारण सारखे नसले तरी अभ्यासातून काही गोष्टींचा निष्कर्ष लावला जात आहे. फोर्टिस हॉस्पिटल शालीमार बाग येथील न्यूरोलॉजीचे संचालक डॉ जयदीप बन्सल यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, “अति झोपेचा स्ट्रोकच्या घटनेशी कसा संबंध आहे हे स्पष्टपणे समजू शकलेले नाही परंतु अभ्यासातून असे दिसून आले आहे की जे लोक जास्त झोपतात त्यांच्यात कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते आणि वजन वाढून स्ट्रोकचा धोका निर्माण होवू शकते.

बर्‍याच आरोग्य अभ्यासकांना असे वाटते की निरोगी आहार आणि उत्तम स्वस्थ जीवनशैलीमुळे स्ट्रोकचा धोका 80% पर्यंत टाळता येते. व्यायामाचा सराव करणे, जंक फूड, धुम्रपान, अति मद्यपान आणि मादक पदार्थांचे सेवन टाळणे आणि रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि शरीराच्या सामान्य आरोग्यावर नियंत्रण ठेवणे. या काही लहान टिप्स आहेत ज्या तुम्ही दररोज स्वत:साठी केल्या तर तुमचे आरोग्य चांगले राहू शकते. आणि स्ट्रोकचा धोका कमी होवू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: खासदार विरियातो, प्रदेशाध्यक्ष पाटकर पोलिसांच्या ताब्यात; काँग्रेसचे कॅश फॉर जॉब विरोधात आंदोलन

IFFI Goa 2024: "आलीयाच्या सुरक्षेसाठी मी त्याला हाकललं होतं" काही तासांतच 'ते' विधान फिरवल्याने इम्तियाज अली वादाच्या भोवऱ्यात

Goa Today's News Live: कळंगुटमध्ये रस्त्यावर नग्न होऊन राडा करणाऱ्या UP च्या पर्यटकाला अटक

National Cashew Day: गोव्यात काजूचे पीक घेणे का बनत आहे कठीण? कारणे जाणून घ्या..

Goa Bench: निवृत्त कर्मचारी सेवा नियमांत बदल; निवृत्तीवेतनाची थकबाकी देण्यास एक वर्षाची मुदत

SCROLL FOR NEXT