Goa Assembly Live Updates
Goa Assembly Live UpdatesDainik Gomantak

Goa Assembly: टोंका येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाची स्थिती बिकट, जेनिफर मोन्सेरात यांनी वेधलं सरकारचं लक्ष; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Assembly Updates 1 August 2025: जाणून घ्या गोव्यातील पावसाळी अधिवेशनाच्या अपडेट्स, इतर राजकीय घडामोडी आणि इतर महत्वाच्या बातम्या.
Published on

टोंका येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाची स्थिती बिकट, आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी वेधलं सरकारचं लक्ष

टोंका येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाची स्थिती बिकट. स्टाफचीही कमतरता. सहायकांनाही लिपिकाचे काम करावे लागते: आमदार जेनिफर मोन्सेरात

‘गोवा एसटी प्रतिनिधीत्व विधेयक पुन्हा अडवले, काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीचा निषेध’; मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचा आरोप

गोव्यातील अनुसूचित जमाती समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी केंद्रातील सरकारने आणलेले विधेयक संसदेत पुन्हा एकदा अडकले. काँग्रेस (Congress) आणि 'इंडिया' आघाडीने लोकसभेत गोंधळ घातल्यामुळे हे विधेयक मंजूर होऊ शकले नाही. या घटनेचा निषेध करत, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काँग्रेस आणि 'इंडिया' आघाडीवर जोरदार टीका केली.

पंढरपुरात उभारणार वारकरी भवन, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

पंढरपुरात गोवा सरकार वारकरी भवन उभारणार. यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून, जमीन उपलब्ध करुन देण्याची विनंती केली, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानगीशिवाय रस्ते खोदकाम होणार नाही, मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, 50% अपघात खराब रस्ते आणि खराब सिग्नलमुळे होतात. विभागांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. नवीन बांधलेले रस्ते नंतर वीज किंवा पाण्याच्या कामासाठी पुन्हा खोदले जातात. आतापासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानगीशिवाय रस्ते खोदकामाला परवानगी दिली जाणार नाही. हा नियम मोडणाऱ्या कंत्राटदारांना दंड आकारला जाईल. रस्त्यांखाली युटिलिटी डक्ट टाकले जातील, ज्यामुळे वारंवार खोदकाम करण्याची गरज राहणार नाही: डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

Goa Assembly 2025: किनाऱ्यांची धूप रोखण्यासाठी अभ्यास करून त्याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार - मुख्यमंत्री

राज्यातील किनाऱ्यांची धूप रोखण्यासाठी अभ्यास केला जाणार असून, या अभ्यासाच्या आधारे केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

राज्यातील किनारी भागात विकासकामे करताना आणि कोणतीही परवानगी देताना किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (CZMP) तसेच इतर संबंधित खात्यांना नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात येणार, अशीही माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.

Goa Assembly 2025: कोळशावरील 'ग्रीन सेस' वसुलीवरून विरोधक आक्रमक

कोळशावरील 'ग्रीन सेस' वसुलीवरून विरोधक आक्रमक झाल्याच पाहायला मिळालं. २०१३ पासून आतापर्यंत जिंदालने 'ग्रीन सेस'चा एक रुपयाही भरला नाही. जिंदाल, अदानीसारख्या कंपन्यांकडून सरकारची ४ हजार कोटींची फसवणूक झाल्याचा दावा करीत विरोधक सभापतींसमोरील हौदात गेल्यानं कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं. मात्र, सरकारने ३४ कोटींचा प्रलंबित कर वसूल केल्याचा दावा मुख्यमंत्र्यानी केला.

Goa Assembly 2025: 'जिंदालकडून मर्यादेपेक्षा दुप्पट कोळसा हाताळणी', युरी आलेमाव यांचा गंभीर आरोप

जिंदालच्या जेएसडब्ल्यू कंपनीला राज्यात कोळसा हाताळणीसाठी दिलेली अधिकृत मर्यादा ५ दशलक्ष टनांची होती. मात्र, गेल्या काही वर्षांत कंपनीने यापेक्षा दुप्पट म्हणजेच सुमारे १० दशलक्ष टनांपर्यंत कोळशाची हाताळणी केल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे.

सार्वजनिक सुनावणीवेळी लोकांनी घेतलेले आक्षेप, किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाचे (सीझेडएमए) पत्र राज्य सरकारनं पर्यावरण मंत्रालयास पाठवलेच नसल्याचं त्यांनी सांगितलं.

CM Pramod Sawant: आठवी ते दहावीच्या अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करणार - मुख्यमंत्री

राज्यातील आठवी ते दहावीच्या अभ्यासक्रमात आता कृषी विषयाचा समावेश केला जाणार आहे. तसंच अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतात नेऊन अनुभवात्मक शिक्षण दिले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलीय.

CM Pramod Sawant: शेतकर्‍यांनी जमिनी राखून ठेवाव्या - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

राज्यातील शेतकर्‍यांचा फलोत्पादनाकडील कल वाढला. राज्यातील भाजीचे उत्पादन वाढले आहे. राज्यातील शेतकर्‍य‍ांनी आहे ती जमीन शेतीसाठी राखून ठेवणे गरजेचे. सरकार शेतकर्‍यांच्या पाठिशी असल्याने शेतकर्‍यांची संख्या झाली दुप्पट झाली : डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

Dog Attack: काजीवाडा-फोंडा येथे १२ वर्षीय मुलीवर भटक्या कुत्र्याचा हल्ला

काजीवाडा-फोंडा येथे गुरुवारी एका १२ वर्षीय मुलीवर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. या हल्ल्यात ती मुलगी जखमी झाली असून, तिला तात्काळ उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला घरी सोडण्यात आलं.

गोवा Amthane Dam: आमठाणे धरणाचे काम सुरु असून पुढील 4-5 दिवसांत पूर्ण होणार - सुभाष शिरोडकर

आमठाणे धरणाचे काम सुरु असून पुढील 4-5 दिवसांत पूर्ण होणार असल्याची माहिती जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com