शरीराच्या आणि मनाच्या निरोगी आरोग्यासाठी (Health) पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. निरोगी आरोग्यासाठी किमान 7 ते 8 तासांची झोप (Sleep) घेणे गरजेचे आहे. योग्य वेळ झोप घेतल्यास आपल्याला फ्रेश(Fresh) वाटते. पण आजकालच्या धावपळीच्या काळात कामाचा दबाव अधिक असल्याने लोकांना पुरीशी झोप मिळत नसल्याने तणाव अधिक वाढू शकतो. याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होतो. झोपेच्या कमतरतेमुळे कोणत्या समस्या उद्भवू शकतात ते जाणून घेवूया.
* महिलांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका
अनेक संशोधनामध्ये असे दिसून आले की झोपेचा अभाव महिलांच्या पेशींना नुकसान पोहोचु शकते. यामुळे महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो.
* रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते
अपुरी झोप ही समस्या अनेक लोकांना असते. यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. यामुळे अनेक संसर्ग आपल्या शरीरावर आक्रमण करू शकतात. यात सर्दी, खोकला यासारख्या संसर्गजन्य आजारांचा समावेश होतो.
* ताण आणि नैराश्य
झोपेच्या अभावामुळे ताण वाढू शकतो. यामुळे आपले काम देखील योग्यरित्या पूर्ण होत नाही. अशा वेळी आत्मविश्वास कमी होऊ लागतो. यामुळे हळूहळू व्यक्ती नैराश्यात जाऊ लागते.
* मधुमेह, बीपी आणि हृदयाची समस्या
अपुरी झोप आपल्या शरीराच्या पचन संस्थेवर परिणाम करते. यामुळे शरीराचे वजन वाढू शकते आणि मधुमेह,उच्च रक्तदाब आणि हृदयाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.