Honeytrap Case Dainik Gomantak
देश

Honeytrapमध्ये अडकला भारतीय हवाई दलाचा जवान, दिल्ली गुन्हे शाखेने केली अटक

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने हेरगिरीच्या आरोपाखाली भारतीय हवाई दलाच्या एका जवानाला अटक केली आहे.

दैनिक गोमन्तक

Delhi Police: आजकाल आपल्या शत्रू देशाला इजा करण्यासाठी हेरगिरीला शस्त्र बनवले जात आहे. ज्यासाठी काही देश हनी ट्रॅपचा वापर करून शत्रू देशाच्या सैनिकांना लक्ष्य करत आहेत. जेणेकरून सुरक्षा यंत्रणेशी संबंधित माहिती काढण्यात ते यशस्वी होवू शकतील. सध्या अशाच एका प्रकरणात दिल्ली पोलिसांना यश मिळाले आहे. (Honeytrap Case)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने भारतीय हवाई दलाच्या एका जवानाला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र शर्मा असे आरोपीचे नाव आहे. देवेंद्र शर्मा यांना आधी हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून भारतीय हवाई दलाशी संबंधित संवेदनशील माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र शर्मा हनी ट्रॅपमध्ये अडकल्यानंतर त्यांच्याकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे व पत्ते विचारण्यासोबतच किती रडार तैनात करण्यात आले आहेत, याची माहिती काढण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात देशाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. सध्या गुप्तचर संस्थेच्या इनपुटवरून दिल्ली पोलिसांनी आरोपी देवेंद्र शर्माला 6 मे रोजी अटक केली आहे.

गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र शर्माला धौला कुआन येथून अटक करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र शर्मा हा कानपूरचा रहिवासी आहे. त्याची फेसबुकवर एका महिला प्रोफाइलसोबत मैत्री झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर फोन सेक्सच्या माध्यमातून देवेंद्र शर्माला जाळ्यात अडकवून त्याच्याकडून संवेदनशील माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

ती महिला ज्या क्रमांकावरून देवेंद्र शर्मा यांच्याशी बोलायची तो क्रमांक भारतीय सेवा पुरवठादाराचा आहे. सध्या पोलीस महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असून, या प्रकरणात आणखी मदत होऊ शकते. या संपूर्ण कामात पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तेथे मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना आरोपीच्या पत्नीच्या बँक खात्यात काही संशयास्पद व्यवहारही आढळून आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT