Honey Trap Dainik Gomantak
देश

शत्रू राष्ट्राकडून भारतीय जवानावर पुन्हा हनी ट्रॅपचा प्रयोग ?

यात पाकिस्तानी आयएसआयचा हात असल्याचा संशय

Sumit Tambekar

पाकिस्तान भारताशी थेट दोन हात करु शकत नाही. त्यामुळे छुप्या मार्गाने भारतावर हल्ले करण्याच्या प्रयत्नात पाकिस्तान असतो. यासाठी वेगवेगळे प्रयत्न होत असतात. असाच प्रयत्न पुन्हा एकदा पाकिस्तानकडून झाल्याचा संशय दिल्ली पोलिसांनी व्यक्त केला आहे. यात पाकिस्तानी ISAचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. (Honey trap experiment on Indian soldier by enemy nation again ? )

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने भारतीय हवाई दलाच्या एका जवानाला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. देवेंद्र शर्मा असे या आरोपीचे नाव आहे. शर्मा याला आधी हनी ट्रॅपमध्ये अडकवत त्याच्याकडून भारतीय हवाई दलाशी संबंधित संवेदनशील माहिती गोळा केल्याचा संशय आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फेसबुकवर एका महिलेशी मैत्री झाली होती. या महिलेशी मैत्री झाल्यानंतर त्या महिलेने संवेदवशील माहिती गोळा करण्यासाठी याचा वापर केल्या संशय दिल्ली पोलीसांनी व्यक्त केला आहे. तसेच महिला ज्या क्रमांकावरुन बोलायची, तो क्रमांक भारतीय सर्व्हिस प्रोव्हायडरचा आहे. सध्या पोलीस महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असून, या प्रकरणात आणखी मदत होऊ शकते.

या संपूर्ण प्रकरणात पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना आरोपीच्या पत्नीच्या बँक खात्यात काही संशयास्पद व्यवहारही आढळून आले आहेत. त्यामुळे पोलीसांनी ही तपासाची चक्रे वेगाने गतिमान केली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT