West Bengal  Dainik Gomantak
देश

West Bengal Politics: बंगाल हिंसाचारावर अमित शहांचं मंत्रालय अ‍ॅक्शन मोडमध्ये, ममता सरकारकडे...

Manish Jadhav

West Bengal Politics: केंद्रीय गृहमंत्रालयाने पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत ममता सरकारकडून अहवाल मागवला आहे.

यापूर्वी बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी गृहमंत्रालयाला पत्र लिहिले होते. या पत्रानंतर आता गृह मंत्रालयाने ममता सरकारकडून उत्तर मागितले आहे.

गेल्या काही दिवसांत हुगळी आणि हावडा जिल्ह्यात रामनवमीच्या मिरवणुकांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी शुक्रवारी पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांच्याशी हावडा येथील हिंसाचाराच्या संदर्भात फोनवर बोलून परिस्थितीचा आढावा घेतला.

यासंदर्भात शहा यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मुझुमदार यांच्याशीही चर्चा केली होती. आता गृह मंत्रालयाने बंगाल सरकारकडून राज्यातील वाढता हिंसाचार आणि राज्यातील ढासळत चाललेली कायदा आणि सुव्यवस्था याबाबत अहवाल मागवला आहे.

तसेच, गृह मंत्रालयाच्या वतीने बंगाल सरकारला (Government) लवकरच अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

राज्याच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात विचारण्यात आले आहे की, हिंसाचारप्रकरणी राज्य पोलिसांनी काय कारवाई केली? हिंसाचाराच्या संदर्भात राज्य पोलिसांनी काय पावले उचलली आहेत? यासंदर्भात संपूर्ण माहिती मागवण्यात आली आहे.

त्याचवेळी, पोलिसांनी सांगितले की, 30 मार्च रोजी उत्सवादरम्यान दोन गटात हाणामारी झाली होती. परिसरातील अनेक वाहनांची जाळपोळ आणि दुकानांची तोडफोड करण्यात आली. हावडा येथील हिंसाचारप्रकरणी 30 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.

याआधी, त्यांच्या पत्रात सुकांत मजुमदार यांनी लिहिले होते की, “काल संध्याकाळी हुगळी जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांवर जोरदार दगडफेक करण्यात आली होती, त्यामुळे रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती.

ही हिंसा पश्चिम बंगालच्या सत्ताधारी पक्षाच्या म्हणजेच टीएमसी आणि त्यांच्या शीर्ष नेतृत्वाच्या पाठिंब्याशिवाय चालू ठेवता येणार नाही.'' तसेच, सध्याचे पोलीस महासंचालक मनोज मालवीय यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhandari Community In Goa: निवडणुकीची घोषणा होणार? भंडारी समाजाच्या आमसभेकडे सगळ्यांचे लक्ष

Mhadei Water Dispute: 'म्हादई'बाबत चुकीची माहिती नको! नेरसे येथे जलवाहिनीचे काम सुरु नाही

Goa Forward: नोकरभरतीसंदर्भात 'सात दिवसांत' योग्य निर्णय घ्या; गोवा फॉरवर्डची मागणी

Subhash Velingkar: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वेलिंगकरांच्या अटकेसाठी गोवा पोलिसांची महाराष्ट्रात शोध मोहीम!

खरी कुजबुज: जीत - मायकल आमने सामने

SCROLL FOR NEXT