Amit Shah Dainik Gomantak
देश

खलिस्तान लिबरेशन फोर्सचा दहशतवादी गटांच्या यादीत समावेश, आतापर्यंत 40 संघटनांवर घालण्यात आली बंदी!

गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, केएलएफ संघटना 1986 मध्ये पंजाबमध्ये खलिस्तानच्या मागणीसह अस्तित्वात आली.

Manish Jadhav

KLF Added List of Banned Terrorist Organization: खलिस्तान लिबरेशन फोर्स (KLF) या दहशतवादी संघटनेचा गृह मंत्रालयाने प्रतिबंधित संघटनांच्या यादीत समावेश केला आहे. या यादीत आतापर्यंत 39 दहशतवादी संघटनांची नावे होती. आता गृह मंत्रालयाने KLF चे नाव 40 वी प्रतिबंधित संघटना म्हणून यादीत समाविष्ट केले आहे.

पंजाबमधील अनेक घटनांमागे केएलएफचा हात

गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, केएलएफ संघटना 1986 मध्ये पंजाबमध्ये खलिस्तानच्या मागणीसह अस्तित्वात आली. कोणत्याही मार्गाने पंजाबला भारतापासून वेगळे करणे हे या संघटनेचे उद्दिष्ट होते. स्थापन झाल्यापासून, KLF चे नाव अनेक निरपराध लोकांच्या आणि पोलिस अधिकार्‍यांच्या हत्येच्या प्रकरणांमध्ये सामील आहे. या संघटनेने खंडणी, अपहरण आणि बँक लुटण्यासाठी आपले नेटवर्क वाढवण्याचे काम केले. केएलएफने पंजाबमधील तरुणांची दिशाभूल करुन त्यांना दहशतवादाच्या मार्गावर नेण्याचे काम केले.

दरम्यान, पोलिसांनी केएलएफच्या चार दहशतवाद्यांना अटक केली होती आणि अमृतसरमध्ये एका मोठ्या मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता. काही दिवसांपूर्वी सुरक्षा यंत्रणांनी या संघटनेच्या अनेक सदस्यांना अटक केली होती. केएलएफने आठ जणांची हत्या करुन आपली उपस्थिती कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. आयईडी आणि इतर प्रकारचे बॉम्ब बनवण्यातही या संघटनेचा हात आहे.

ग्रह मंत्रालयाच्या यादीत या संघटनांचा समावेश

दरम्यान, यादीत समाविष्ट असलेल्या इतर दहशतवादी संघटनांमध्ये बब्बर खालसा इंटरनॅशनल, खलिस्तान कमांडो फोर्स, खलिस्तान जिंदाबाद फोर्स, लष्कर-ए-तैयबा/पासबान-ए-अहले हदीस, जैश-ए-मोहम्मद/तेहरिक-ए-फुरकान, हरकत-उल-मुजाहिदीन यांचा समावेश आहे. हरकत-उल-अन्सार/हरकत-उल-जिहाद-ए-इस्लामी, हिज्बुल-उल-मुजाहिदीन/हिज्बुल-उल-मुजाहिदीन पीर पंजाल रेजिमेंट, अल-उमर-मुजाहिदीन, जम्मू आणि काश्मीर इस्लामिक फ्रंट.

प्रतिबंधित संघटनांची यादी

आसाममधील युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (उल्फा), नॅशनल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ बोडोलँड (एनडीएफबी), आसाममधील पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए), युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट (यूएनएलएफ), 15 पीपल्स रिव्होल्युशनरी पार्टी ऑफ कांगलेपाक (प्रेपॅक), कांगलेपाक कम्युनिस्ट पार्टी (केसीपी), कांगलेई याओल कंबा लुप (केवायकेएल), मणिपूर पीपल्स लिबरेशन फ्रंट (एमपीएलएफ), ऑल त्रिपुरा टायगर फोर्स, नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा, लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (एलटीटीई), स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया, दीनदार अंजुमन, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट), माओईस्ट कम्युनिस्ट सेंटर (MCC), अल बद्र, जमियत-उल-मुजाहिदीन आणि अल-कायदा यांचाही समावेश आहे.

गृह मंत्रालयाच्या यादीत टीएनएलएचाही समावेश

या यादीमध्ये दुखतरन-ए-मिल्लत (DeM), तामिळनाडू लिबरेशन आर्मी (TNLA), तमिळ नॅशनल रिट्रीव्हल ट्रूप्स (TNRT), अखिल भारत नेपाळी एकता समाज (ABNES), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी), इंडियन मुजाहिदीन, गरौ नॅशनल लिबरेशन आर्मी (GNLA), कामतापूर लिबरेशन ऑर्गनायझेशन, इस्लामिक स्टेट/इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि लेव्हंट/इस्लामिक स्टेट इराक आणि सीरिया, नॅशनल सोशालिस्ट कॉन्सिल ऑफ नागालँड (खापलांग), एनएससीएन (के).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Gopal Khemka Murder: बिहार हादरले, गोळ्या घालून प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या

SCROLL FOR NEXT