Home Minister Amit Shah Dainik Gomantak
देश

Jammu And Kashmir: अमित शहांनी NSA अजित डोवाल यांची घेतली भेट

काश्मीरमध्ये सुरु असलेल्या हत्याकांडावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी NSA अजित डोवाल यांची भेट घेतली आहे.

दैनिक गोमन्तक

काश्मीरमध्ये सुरु असलेल्या हत्याकांडाच्या पाश्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी NSA अजित डोवाल यांची भेट घेतली आहे. या बैठकीत काश्मीरमध्ये घडलेल्या टार्गेट किलिंगच्या घटनांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह हेही उपस्थित होते. एनएसए डोवाल सध्या शाह यांची भेट घेण्यासाठी नॉर्थ ब्लॉकमध्ये आहेत. सुमारे तासाभरापासून ही बैठक सुरु आहे.

दरम्यान, कुलगाममध्ये तीन दिवसांत खोऱ्यातील हिंदूंवर झालेल्या दुसऱ्या हल्ल्यात एका राजस्थानस्थित बँक व्यवस्थापकाची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. इलाकाही देहाती बँकेच्या आरेह शाखेत घुसल्यानंतर एका दहशतवाद्याने बँक व्यवस्थापक विजय कुमार यांच्यावर गोळी झाडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मारेकरी शाखेत घुसून गोळीबार करुन पळून गेल्याचे दिसत आहे. विजय कुमार यांना रुग्णालयात घेऊन जात असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

तसेच, जम्मूतील हिंदू शिक्षिका रजनी बाला यांची कुलगाममधील शाळेबाहेर दहशतवाद्यांनी (Terrorists) हत्या केल्यानंतर दोनच दिवसांनी हा हल्ला झाला आहे. कुलगामला लागून असलेल्या शोपियान जिल्ह्यात दोन मोठ्या घटनांनंतर 24 तासांत बँक मॅनेजरची हत्या करण्यात आली. फारुख अहमद शेख नावाचा एक नागरिक काल संध्याकाळी त्याच्या घरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झाला.

शिवाय, दुसऱ्या एका घटनेत आज सकाळी त्यांच्या वाहनाचा स्फोट होऊन तीन जवान जखमी झाले. यातील एक जवान गंभीर जखमी झाला आहे. लष्कराच्या म्हणण्यानुसार, तिन्ही जवानांनी दहशतवादविरोधी कारवाईसाठी खासगी वाहन घेतले होते. त्यांनी पुढे सांगितले की, ते नेमलेल्या भागाकडे जात असताना हा स्फोट झाला.

दुसरीकडे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी बँक व्यवस्थापकाच्या हत्येचा निषेध केला. काश्मीरमध्ये शांतता राखण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांनी एनडीए सरकारवरही टीका केली आणि त्यांनी नागरिकांच्या (Citizens) सुरक्षिततेची खात्री केली पाहिजे असे सांगितले.

त्याचबरोबर, काश्मिरी पंडितांनी आपल्याला सुरक्षित ठिकाणी हलवण्याची मागणी करत केलेल्या व्यापक निषेधादरम्यानही हा हल्ला झाला आहे. काश्मिरी पंडित राहुल भट यांची गेल्या महिन्यात बडगाम येथील दंडाधिकारी कार्यालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यापासून समुदायाचे सदस्य निषेध करत आहेत.

याशिवाय, खोऱ्यात काम करणाऱ्या सुमारे 4,000 काश्मिरी पंडितांनी पंतप्रधानांच्या पुनर्वसन पॅकेजचा भाग म्हणून मोठ्या प्रमाणावर स्थलांतराची धमकी दिली आहे, कारण त्यांना आता सुरक्षित वाटत नाही. त्यांना जाण्यापासून रोखण्यासाठी प्रशासनाने बॅरिकेड्स लावले असून संक्रमण शिबिरांचे दरवाजे बंद केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

ICC ODI World Cup 2027: अखेर ठरलं! वनडे वर्ल्ड कपचा थरार 'या' तारखेपासून रंगणार; अंतिम सामन्याचीही तारीख निश्चित

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

SCROLL FOR NEXT