Digvijay Singh

 

Dainik Gomantak 

देश

'हिंदूचा हिंदुत्वाशी काही संबंध नाही, गोमांस खाणारे पण...': दिग्विजय सिंह

सावरकरांच्या (Savarkar) पुस्तकात असे लिहिले आहे की, हिंदू (Hindu) धर्माचा हिंदुत्वाशी (Hindutva) काहीही संबंध नाही.

दैनिक गोमन्तक

दिग्विजय सिंह (Digvijay Singh) भोपाळमध्ये (Bhopal) जन जागरण अभियानांतर्गत कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देत होते. यावेळी ते म्हणाले की, सावरकरांच्या (Savarkar) पुस्तकात असे लिहिले आहे की, हिंदू (Hindu) धर्माचा हिंदुत्वाशी (Hindutva) काहीही संबंध नाही. एवढेच नाही तर सावरकरांच्या पुस्तकात गाय ही आपली माता असू शकत नाही, तर स्वतःच्या विष्ठेमध्ये लोळणारी गाय माता कशी असू शकते, असे लिहिले आहे. यासोबत गोमांस खाण्यात कोणतेही नुकसान नाही असेही त्यांनी लिखान केले आहे. हे खुद्द सावरकरांनीच सांगितले आहे, जे आज आरएसएस आणि भाजपचे खास विचारवंत आहेत.

दरम्यान, आमची लढाई आरएसएसच्या (RSS) विचारसरणीशी आहे. 2024 मध्ये पुन्हा मोदी आले किंवा भाजप आले तर ते आधी संविधान बदलतील, आरक्षण संपवतील, असंही दिग्विजय सिंह (Digvijay Singh) म्हणाले. या लोकांनी रशिया-चीन मॉडेल स्वीकारले आहे, गरिबांना मोफत धान्य वाटप केले असून सर्व कमाई काही निवडक लोकांवर खर्च केली जात आहे.

दिग्विजय पुढे म्हणाले की, हा देश विविधतेचा देश आहे. इथे गोमांस खाणारे हिंदूही आहेत. विशेष म्हणजे गोमांस खाऊ नये असे कुठे लिहिले आहे आणि बहुतेक हिंदू गोहत्येच्या विरोधात आहेत. ते पुढे म्हणाले की, सावरकर हे भाजप (BJP) आणि संघाचे विचारवंत आहेत, सावरकरांची ही गोष्ट इथल्या किती लोकांना माहीत आहे, हात वर करा. आता भाजप आणि संघाच्या नेत्यांसमोर हे बोलणार की नाही.

अटलजी अगदी चुकीच्या पक्षात

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (atal bihari vajpayee) यांच्या जयंतीनिमित्त दिग्विजय यांनी आज ट्विट करुन अटलजींबद्दल बरोबर बोलले होते, असे त्यांनी म्हटले आहे. ते योग्य नेते होते, त्यांची विचारधाराही गांधीवादी समाजवादाची होती परंतु चुकीच्या पक्षात होते. अटलजींनी मोदीजींना राजधर्माचे पालन करण्याचा सल्ला दिला होता, परंतु मोदीजींनी ते सर्व केले जे अटलजींच्या धोरणांच्या विरोधात होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

SCROLL FOR NEXT